देवदर्शनास आलेल्या भाविकाचा आकस्मिक मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवदर्शनास आलेल्या भाविकाचा आकस्मिक मृत्यू
देवदर्शनास आलेल्या भाविकाचा आकस्मिक मृत्यू

देवदर्शनास आलेल्या भाविकाचा आकस्मिक मृत्यू

sakal_logo
By

देवदर्शनास आलेल्या भाविकाचा मृत्यू
देवगड, ता. १६ ः डोंबिवली (मुंबई) येथून तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे देवदर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा आकस्मिक मृत्यू झाला. राजेश पिराजी कसोटे (वय५७) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना रविवारी (ता.१५) सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, राजेश कसोटे यांच्यासह अन्य काहीजण खासगी वाहनाने देवदर्शनासाठी तालुक्यामध्ये आले होते. अन्य ठिकाणी दर्शन करून रविवारी सायंकाळी कुणकेश्‍वरमध्ये देवदर्शनासाठी आले. देवदर्शन झाल्यानंतर राजेश कसोटे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तात्काळ येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यु झाला. येथील पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली. अधिक तपास पोलीस हवालदार राजन जाधव करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58828 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top