रत्नागिरी-कोकणातील पर्यटन गावांचे होणार मूल्यांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-कोकणातील पर्यटन गावांचे होणार मूल्यांकन
रत्नागिरी-कोकणातील पर्यटन गावांचे होणार मूल्यांकन

रत्नागिरी-कोकणातील पर्यटन गावांचे होणार मूल्यांकन

sakal_logo
By

22417ः रत्नागिरीः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कृषी पर्यटन व सैनिकांचे गाव अशी ओळख असलेले चौकुळ या निसर्गरम्य गावाचे दृश्‍य. (संग्रहीत)
..
कोकणातील पर्यटन गावांचे होणार मूल्यांकन

युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ; सर्वोत्तम गाव म्हणून मिळणार ओळख
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनमार्फत कोकणातील पर्यटन गावांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी ठराविक निकषांच्या आधारे मूल्यांकन करून त्या गावांना ’सर्वोत्तम पर्यटन गाव’ म्हणून ओळख निर्माण करण्यास मदत करण्यात येणार आहे.
देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले कोकण हे निसर्गाने संपन्न असलेले गाव. यामध्ये, कोकणातील पश्चिम किनारपट्टीवर असलेले रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील समुद्रकिनारे, ऐतिहासिक गडकिल्ले हे कोकणाचे विशेष आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेले किल्ले रायगड हे जगभरातील शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आहे. तर, महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे, श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर, मुरूड येथील जंजिरा किल्ला यांची ओळख निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेले अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन हे तालुके समुद्र पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे अवघ्या एक ते दोन दिवसांची सुट्टी घालवण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे येथील अनेक पर्यटक हे मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. या तालुक्यातील पर्यटन व्यवसायावर आधारित अनेक उद्योगधंद्यांना याचा आर्थिक नफा होत आहे.
..
चौकट
ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी सिंधुदुर्गला संधी
कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या गावांना त्यांची ओळख निर्माण करण्याची संधी या योजनेमार्फत दिली जाणार आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथील सुवर्ण गणेश मंदिर आणि थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान हे तिथे असलेल्या मिनीट्रेनमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. गणपती मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेले पेण तालुक्यातून जगभरात हजारो मूर्त्या पाठविला जात असल्याने पेण तालुक्याची विशेष अशी ओळख निर्माण झाली आहे.
...
चौकट
विविध मुद्द्यांच्या आधारे मूल्यांकन
त्यामध्ये ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची युएनडब्ल्यूटीओच्या सल्लागार मंडळाकडून मूल्यांकन केले जाणार आहे. यात, नैसर्गिक व सांस्कृतिक साधनांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख, जतन आणि प्रसिद्धीसाठी उपायोजना, प्लॅस्टिक वापरावर नियंत्रण, रस्ते, सुविधा व आधुनिक संपर्क साधने, आरोग्य आणि सुरक्षितता, नैसर्गिक आपत्ती निवारण योजना या मुद्द्यांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. तसेच, आपल्या गावाचे नाव जागतिक पातळीवर मिळण्यासाठी जास्तीत जास्त गावांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58946 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top