रत्नागिरी-किनार्‍यावरील ‘फेणी’ देतेय मॉन्सूनची वर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-किनार्‍यावरील ‘फेणी’ देतेय मॉन्सूनची वर्दी
रत्नागिरी-किनार्‍यावरील ‘फेणी’ देतेय मॉन्सूनची वर्दी

रत्नागिरी-किनार्‍यावरील ‘फेणी’ देतेय मॉन्सूनची वर्दी

sakal_logo
By

- rat17p11.jpg
22412
- मांडवी किनारी तांबुस रंगाची फेणी दिसू लागली.
..
खालील २ फोटो चौकटीजवळ लावावेत
22434ः धनेश पक्षी
22437ः संग्रहीत
..
-------------
किनाऱ्‍यावरील ‘फेणी’ देतेय मॉन्सूनची वर्दी

लवकरच आगमन; स्थलांतरित पक्षी परतीच्या वाटेवर, घरटी बांधणीसाठी गडबड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः हवामान विभागाने यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर होईल, असा अंदाज बांधला आहे. त्याला पुरक असेच बदल निसर्गातही जाणवत आहेत. समुद्राच्या लांटामधून किनारपट्टीवर तांबूस रंगाची फेणी म्हणजे फेस येण्यास सुरवात झाला आहे. हा फेस गडद होत गेला की मॉन्सून कालावधी जवळ येतो, असे निरीक्षण किनारी भागात राहणारे नागरिकांसह मच्छीमारांनी वर्तवला आहे.
मोसमी पाऊस यावर्षी काही दिवस आधीच कोकणात पोचेल, अशी शक्यता आहे. त्यानुसार शेतकरी, मच्छीमार यांना नियोजन करावे लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवर मॉन्सुनची चाहूल दर्शवणारे बदल दिसू लागले आहेत. दरवर्षी सर्वसाधारणपणे २० मेनंतर समुद्रकिनारी दिसणारे बदल आतापासूनच जाणवू लागले आहेत. त्यामुळे पावसाळा लवकर सुरू होणार, असा ठोकताळा मच्छीमार बांधत आहेत. समुद्र खवळला असून वारेही वाहायला लागलेले आहेत. किनाऱ्‍यावर जाणवणारा या पद्धतीचा वारा २० मेनंतर वाहत असतो. यावर्षी तो लवकर सुरू झाला आहे. पक्षीही घरटी बांधण्यासाठी काड्या जमा करायला लागल्या आहेत. पावसापूर्वी दिसणाऱ्‍या धनेश पक्षाचेही आगमन झाले असून त्याचे दर्शन काहींना होत आहे. मुंग्यांची दाट आणि गडद वारुळे तयार होऊ लागली आहे. त्यावर पाणी पडले तरीही ती चिखल होत नाही. किनारी भागासह आजूबाजूच्या परिसरातील दिसणारे बदलानुसार ४ ते ५ जून या कालावधीत पाऊस सुरू होईल, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. दरम्यान, मान्सून अंदमानात दाखल झाल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. हे वारे पुढे वाहून येण्यासाठी आवश्यक वारेही वाहत असल्याने पाऊस नेहमीपेक्षा लवकर येऊ शकतो.
----------------
कोट
पावसाळा सुरू होण्यापूर्वी किनारी भागात विविध बदल दिसून येत आहेत. हे बदल दरवर्षीपेक्षा पाच दिवस आधी जाणवत आहेत. त्यामुळे मॉन्सून लवकर दाखल होईल.
-सुनील शिवलकर, नागरिक, मांडवी किनारी
..
चौकट
किनारी भागात लाटांबरोबर तांबूस फेस
पावसाळा जवळ आला की समुद्र किनारी भागात लाटांबरोबर तांबूस फेस जमा होऊ लागतो. दोन दिवसांपूर्वी फेस असलेल्या लाटा दिसू लागल्या आहेत. किनाऱ्‍यावर खाद्यान्नासाठी स्थलांतरित झालेले अनेक पक्षीही परतीच्या मार्गावर लागले आहेत. भाट्ये खाडी किनारी त्याचा अनुभव येतो. त्या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात अनेक छोटे-मोठे मासे प्रजननासाठी खाडी किनाऱ्‍याकडे येऊ लागतात, तर कोळंबीही सापडू लागली आहे. ही पावसाची वर्दी असल्याचे मच्छीमारांचे मत आहे. हाच मासा खाडी किनाऱ्‍याने शेतामध्ये किंवा किनारा सोडून पाण्याबरोबर वाहून येतो. त्याला चढणीचे मासे म्हटले जाते. किनारी भागात कोळंबी काही प्रमाणात तर विविध प्रकारचे मासे जाळ्यात सापडू लागले आहेत.
..
एक नजर..
पावसाळा लवकर सुरू होणार; मच्छीमारांचा अंदाज
समुद्र खवळला असून वारेही वाहायला लागले
पक्षींकडून घरटी बांधण्यासाठी काड्यांची जमवाजमव
मुंग्यांची दाट आणि गडद वारुळे होताहेत तयार
स्थलांतरित झालेले अनेक पक्षीही परतीच्या मार्गावर
अनेक छोटे-मोठे मासे प्रजननासाठी खाडी किनाऱ्‍याकडे
किनारी भागात कोळंबी, विविध प्रकारचे मासे जाळ्यात

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58969 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top