-कृषी महोत्सव फायदेशीर ठरेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-कृषी महोत्सव फायदेशीर ठरेल
-कृषी महोत्सव फायदेशीर ठरेल

-कृषी महोत्सव फायदेशीर ठरेल

sakal_logo
By

L२२४१६

- कुडाळ ः आमदार वैभव नाईक यांनी या महोत्सव ठिकाणी भेट देऊन जिल्हा प्रशासनाकडून महोत्सव नियोजनाचा आढावा घेतला. (छायाचित्र ः अजय सावंत)

कृषी महोत्सव फायदेशीर ठरेल
वैभव नाईक ः आज उद्घाटन, मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत कुडाळ येथे १७ पासून होणाऱ्या सिंधू कृषी, पशु, पक्षी प्रदर्शन व पर्यटन महोत्सवाचा आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी (ता.१६) जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मुख्य उद्घाटन उद्या (ता.१८) राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे. ज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा या उद्घाटन सोहळ्याला ऑनलाईन उपस्थित राहणार असून समारोप पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. राज्याच्या विविध भागातून विविध कृषीविषयक स्टॉल तसेच पशुपक्षी या महोत्सवात सहभागी होणार आहेत. हा कृषी महोत्सवाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरेल, असा विश्वास आमदार नाईक यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

कृषी व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने १७ ते २० या कालावधीत कुडाळ येथील नवीन एसटी डेपोच्या मैदानावर (हायवेनजिक) सिंधू कृषी औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन व पर्यटन मेळाव्याचे आयोजन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कृषी महोत्सवाची जय्यत तयारी केली जात असून भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी कुडाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार नाईक यांनी या महोत्सव ठिकाणी भेट देऊन जिल्हा प्रशासनाकडून महोत्सव नियोजनाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे प्रशासक प्रजित नायर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, कुडाळ तालुका संपर्क प्रमुख सुरेश पाटील, तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेवक संतोष शिरसाट, माजी नगरसेवक सचिन काळप, नगरसेविका सौ. सई काळप, सौ. श्रुती वर्दम, उदय मांजरेकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा कृषी अधिकारी एस. एन. म्हेत्रे, कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी विद्यानंद देसाई, श्री. सुतार, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, पंचायत समिती कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
............

शेतकर्यांना मार्गदर्शन
आमदार नाईक म्हणाले, " कृषी महोत्सवात राज्यातील विविध भागातून विविध प्रकारचे स्टॉल सहभागी झाले आहेत. विविध प्रकारे पशु पक्षी आणण्यात आले आहेत. बचतगटांचे स्टॉलही सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा कृषी महोत्सव निश्चितच फायदेशीर ठरणार आहे."
सतीश सावंत म्हणाले, "या कृषी महोत्सवात आधुनिक शेळीपालन, गाय म्हैसी पालन, कुक्कुटपालन, पशुपक्षी यांसह कृषी, पशुसंवर्धन विषयक योजना, सिंधुरत्न योजनांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जाणार आहे. पारंपरिक बियाणे, कृषी यांत्रिकीकरणाचीही माहीती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. पावसाळा जवळ आला असून त्याला पोषक हे कृषी प्रदर्शन होत आहे. यात शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी." माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पडते म्हणाले, "काहींनी या कृषी प्रदर्शनाला विरोध केला होता; मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेले हे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल आम्ही प्रशासनाचे अभिनंदन करतो. जिल्हातील शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाचा निश्चितच फायदा होईल."
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58970 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top