
राऊळ महाराज पुण्यतिथी सोहळ्यास भाविकांची गर्दी
swt1710.jpg
22423
पिंगुळीः विनायक (अण्णा) राऊळ महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. (छायाचित्र ः अजय सावंत)
राऊळ महाराज पुण्यतिथी
सोहळ्यास भाविकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ : विनायक (अण्णा) राऊळ महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात अलोट भाविकांच्या गर्दीत झाला. यानिमित्ताने काकड आरती, नाममंत्र, हवन, बलिदान, महापूर्णाहुती, अभिषेक, नैवेद्य, आरती समाधीस्थानाची महापूजा, दुपारी श्रींची आरती, अखंड महाप्रसाद झाला. बुवा विशाल राणे, बाद पांचे सुश्राव्य भजन, हनुमान दामोदर प्रासादिक भजन मंडळ (राऊळ महाराज भक्त मंडळ) साटेली भेडशी (ता. दोडामार्ग) यांचे सुश्राव्य भजन, राऊळ गीतमाला (सादरकर्ते राऊळ महाराज भक्त मंडळ, मुंबई) यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम, कुमार प्रणव अवधूत चारी, गोवा यांचे सतार वादन, तबला साथ विनय पेडणेकर (गोवा), सांजआरती आदी कार्यक्रम झाले.
या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. या संपूर्ण धार्मिक कार्य ग्रामपुरोहित दुर्गाप्रसाद दांडेकर व राजू मुंडले यांच्या अधिपत्याखाली झाले. समाधी मंदिर परिसरातील फुलाची आकर्षक सजावट अजित अंगणे, अॅड. सुरज आंगणे, हरेश्वर गोसावी, सुधीर परब, संतोष बेर्डे, किशोर नेवरेकर, शेखर चव्हाण व सहकारी यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलेश गुरव, राजा सामंत यांनी केले. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुवर्णा आमोणकर यांच्या सौजन्याने सोनल केबल मुंबई, गोवा यांच्यावतीने करण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58978 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..