ओवीसी विरोधात न्यायालयात जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओवीसी विरोधात न्यायालयात जाणार
ओवीसी विरोधात न्यायालयात जाणार

ओवीसी विरोधात न्यायालयात जाणार

sakal_logo
By

L22429

- कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना अ‍ॅड. सुहास सावंत. सोबत बंड्या सावंत. (छायाचित्र ः अजय सावंत)

ओवेसी विरोधात न्यायालयात जाणार
अ‍ॅड. सुहास सावंत ः मराठा महासंघातर्फे कृतीचे निषेध
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः एमआयएमचे नेते ओवेसी यांनी महाराष्ट्राचा शत्रु असलेल्या औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहुन त्याच उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा सिंधुदुर्ग जिल्हा मराठा महासंघ निषेध करत आहे. येथील पोलिसांनी तक्रार देऊन कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे १९ मेनंतर ओवीसी विरोधात न्यायायलात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा संयोजक तथा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत यांनी दिली.
कुडाळ एमआयडीसी येथे सोमवारी (ता.१६) घेतलेल्या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. सावंत बोलत होते. यावेळी मराठा युवा मोर्चाचे बंड्या सावंत उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. सावंत म्हणाले, "ओवीसीने महाराष्ट्रातील इतर कबरींना फुल वाहण्याला आमचा मुळीच विरोध नाही; मात्र औरंगजेब हा कायम महाराष्ट्राच्या विरोधात राहिला. या विरोधात पोलिसांना शिवप्रेमींच्या वतीने निवेदन दिले; मात्र पोलिसांकडुन काहीच हालचाली झाल्या नाहीत. परिणामी १९ मे नंतर याप्रश्नी आवाज उठविला जाईल."

आता यापुढे मराठा महासंघाने आरक्षणाच्या मागे न लागता उद्योजक व्हावे, जेणेकरून नोकरी मागणारे न होता, नोकरी देणारे समाजात व्हावे, असा संकल्प सिंधुदुर्ग मराठा समाजाने हाती घेतला आहे. त्या पार्श्वभुमीवर गुरूवारी (ता.१९) मुंबई-गोवा महामार्गावरील नविन एसटी स्टॅण्डच्या समोर नाडकर्णी स्टाईलच्या बाजुकडुन हॉल मध्ये ‘उद्योजक डिरेक्टरी’चे लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठा समाजातील उद्योजकांचा सत्कार सुध्दा करण्यात येणार आहे. भविष्यात ही संकल्पना मराठा समाजासह जिल्ह्यातील इतर सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. सिंधुदुर्ग जिल्हा एक प्रकारे व्यावसायिक हब तयार होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती अ‍ॅड. सावंत यांनी दिली.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58986 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top