पेडणेकर, विरनोडकरचे बुध्दीबळ स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेडणेकर, विरनोडकरचे बुध्दीबळ स्पर्धेत यश
पेडणेकर, विरनोडकरचे बुध्दीबळ स्पर्धेत यश

पेडणेकर, विरनोडकरचे बुध्दीबळ स्पर्धेत यश

sakal_logo
By

swt१७१३.jpg
२२४३१
सावंतवाडीः बुद्धिबळ स्पर्धेतील यशस्वी खेळाडू.


पेडणेकर, विरनोडकरचे
बुध्दीबळ स्पर्धेत यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः सांगली येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई अकॅडमीचा राष्ट्रीय खेळाडु बाळकृष्ण पेडणेकर आणि रॅपिड स्पर्धेत राजेश विरनोडकर या दोघांनी पारितोषिके मिळवली. बाळकृष्ण याने सहा दिवस घेण्यात आलेल्या ५३ व्या (कै.) श्री. बाबु काका शिरगावकर क्लासिकल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत रेटींग कॅटेगरीत तिसरा क्रमांक मिळवला. दोन दिवस घेण्यात आलेल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर याने १९ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला आणि राजेश विरनोडकर याने १६ वर्षे वयोगटात दुसरा क्रमांक मिळवला.
स्पर्धेसाठी भारतातील विविध राज्यातील १०१ खेळाडु उपस्थित होते. पारितोषिकप्राप्त खेळाडुंना रोख बक्षिसे, ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना मुक्ताई अकॅडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे आणि अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58993 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top