संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

-rat17p26.jpg
L22455
-चिपळूण ः पिंपळी येथे बौद्ध पौर्णिमा निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेले ग्रामस्थ.
-----------
चिपळूण तालुक्यात बौद्ध पौर्णिमा उत्साहात
चिपळूण ः चिपळूण तालुक्यात बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध शिबिर, महापरित्राण पाठ, धम्म देसना आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते संदेश पवार म्हणाले, भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या दिवशी झाल्याने ही पौर्णिमा त्रिगुणी जयंती म्हणून साजरी करण्यात येते. भारतीय बौद्ध महासभा, वंचित विकास आघाडी, बौद्धजन हितसंरक्षक समिती यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ मंडळी यांच्यातर्फे बौद्ध विहारामध्ये ही जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त तालुक्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर कार्यक्रम सुरू आहेत.
-----------
बौद्धवाडीतील शिबिराला प्रतिसाद
चिपळूण ः लोकजागृती फाउंडेशन रत्नागिरी, भीमज्योत तरुण मित्रमंडळ करंबवणे, प्राथमिक आरोग्यकेंद्र कापरे आणि अपरान्त हॉस्पिटल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान बुद्ध जयंतीचे औचित्य साधून करंबवणे बौद्धवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कापरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश यादव, अपरान्त हॉस्पिटलच्या डॉ. मनोरमा जाधव, माधवबागच्या डॉ. मयुरी जाधव यांनी रुग्णांची तपासणी केली. आरोग्य तपासणीबरोबरच रक्ताची तपासणी, ईसीजी आदी करून मोफत औषधे ही देण्यात आली. या शिबिरासाठी कापरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर, अपरान्त हॉस्पिटलचे ॲडमिन राजीव कांबळे, आरोग्यसेविका अंजली निर्मळ, रूपाली बैकर, कापरेच्या सुजाता कानडे, आरोग्यसेवक नरेंद्र चव्हाण, उमेश मोहिरे, लॅब टेक्निशियन नांदलस्कर, आशासेविका मदतनीस यांनी सहकार्य केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी करंबवणे बौद्धवाडीचे अध्यक्ष धर्मेंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रभाकर पवार यांच्यासह राजेश पवार, अविनाश पवार, भूपेंद्र पवार, ॲड. जयेश पवार आदींनी मेहनत घेतली.
--------
कालुस्तेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
चिपळूण ः कालुस्ते पंचक्रोशी ग्रामविकास मंडळ मुंबईच्या नूतन माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. माजी विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक अनुभव कथन करताना शिक्षक, संस्था पदाधिकारी व सदस्य यांचे आभार मानले. यापुढे अकरावी, बारावी कला व वाणिज्यचे वर्ग सुरू करावेत, त्यासाठी आम्ही सहकार्य करू, अशी ग्वाही माजी विद्यार्थ्यांनी दिली. आठवीचा वर्ग बाबूराव कदम यांच्या निवासस्थानी सुरू झाल्याची आठवण करून देत आता तर संस्थेच्या दोन इमारती आहेत. त्यामुळे हे नवीन वर्ग सुरू करण्यास कोणतीही अडचण येणार आहे. या वर्षी विनाअनुदान पद्धतीने शासनाची परवानगी घेऊन अकरावी कला, वाणिज्य वर्ग सुरू करावा, अशी आशा व्यक्त केली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण ठसाळे उपस्थित होते.
---------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59014 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top