हत्ती बाधित केरकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्ती बाधित केरकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
हत्ती बाधित केरकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

हत्ती बाधित केरकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

sakal_logo
By

swt1716.jpg
22460
महादेव देसाई

हत्ती बाधित केरकडे
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
महादेव देसाई ः नुकसानीची पाहणी नाही
सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. १७ : हत्ती बाधित केर गावाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का? असा प्रश्न केर भेकुर्लीचे उपसरपंच महादेव देसाई यांनी विचारला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाच हत्तींचा कळप केर आणि मोर्ले गावात आहे. तो कधी केरमध्ये तर कधी मोर्लेमध्ये असतो. मधला एक दिवस त्या कळपाने मोर्ले सीमा ओलांडून पाळये गावातही प्रवेश केला होता; पण तेथे फार काळ मुक्काम न करता तो पुन्हा मोर्लेमध्ये आला. गेले चार दिवस तो कळप मोर्लेमध्ये आहे. तो पुन्हा केव्हाही केर गावात जाऊ शकतो. हत्तीच्या या प्रवासात त्यांनी केळी बागायती, माड, कवाथे, बांबू बेटांचे आणि फणसांचे नुकसान केले. वर्षातून काही महिने आणि त्यातील काही दिवस हत्तींचा प्रवास तिलारी धरण क्षेत्रातून हेवाळे, बाबरवाडी, घाटीवडे, बांबर्डे असा होता. त्यात आता केर, मोर्लेची भर पडली आहे. मागील काही वर्षातील सवयीनुसार तो कळप सोनावल मार्गे इसापूर चंदगड हद्दीत जावू शकतो किंवा पाळये, सोनावलमार्गे मेढे धरण व तेथून तिलारी धरण असाही होऊ शकतो किंवा घाटीवडे, बांबर्डेतही तो कळप जाऊ शकतो, असे असले तरी सध्या त्यांचा मुक्काम मोर्ले आणि केर परिसरात आहे.
हत्तींच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त आहेत. नुकसानीचे क्षेत्र आणि तीव्रता वाढत आहे; मात्र लोकप्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची विचारपूस होत नाहीय. अपवाद फक्त आमदार दीपक केसरकर आहेत. त्यांनी शुक्रवारी (ता. १३) मोर्ले गावाला भेट देवून तेथील नुकसानीची पाहणी केली. बाकी लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या दुःखाचे सोयरसुतक नसल्यासारखेच आहे. निवडणुका आला की गावागावात चकरा मारणारे, हात जोडून मतासाठी विनवणी करणारे लोकप्रतिनिधी आता मात्र आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मोकळे झालेत. त्याबद्दल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या नात्याने केर भेकुर्लीचे उपसरपंच देसाई यांनी हत्तीबाधित गावांकडे आणि शेतकऱ्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का? असा प्रश्न विचारला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59022 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top