परिचारिका दिनानिमित्त सायकल फेरीला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिचारिका दिनानिमित्त सायकल फेरीला प्रतिसाद
परिचारिका दिनानिमित्त सायकल फेरीला प्रतिसाद

परिचारिका दिनानिमित्त सायकल फेरीला प्रतिसाद

sakal_logo
By

-rat17p13.jpg
22438
ः दाभोळ ः उपजिल्हा रुग्णालयातील परिचरिकांसोबत सायकलस्वार.
--------------------
परिचारिका दिनानिमित्त सायकल फेरीला प्रतिसाद

दापोलीत आयोजन; सायकलस्वारांचे शिबिरात रक्तदानही
दाभोळ, ता. १७ ः आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त दापोली सायकलिंग क्लबतर्फे १५ मे दापोली शहरातून सायकलफेरी काढण्यात आली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते.
सायकलफेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली-नॅशनल हायस्कूल-काळकाईकोंड आमराई-नशेमन कॉलनी-आझादनगर-खोंडा-फिशमार्केट-उपजिल्हा रुग्णालय दापोली-आझाद मैदान असा ६ कि.मी.चा होता. उपजिल्हा रुग्णालयात परिचारिकांचे आभार मानण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रातल परिचारिकांचे योगदान आणि सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय आरोग्यसेवा अपूर्ण आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत, इन्चार्ज सिस्टर निर्मला जाधव, अनघा घाग, दापोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किशोर जाधव, अधिपरिचारिका साक्षी हांडे, प्रिया वंडकर, गायत्री भाटकर, स्नेहल गोकणे, जोगेश्वरी वळवी, निकिता घुगरे, अर्चना वसावे, स्वप्नाली दाभोळकर, मालिनी वसावे, दीपिका नांदगावकर आणि सहकारी उपस्थित होते. सायकल फेरी झाल्यावर काही सायकलस्वारांनी उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या शिबिरात रक्तदानही केले. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत विनामूल्यपणे सायकलफेरीचे आयोजन केले जाते. या फेरीचे नियोजन करण्यात संदीप भाटकर, केतन पालवणकर, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे, पराग केळसकर, सूरज शेठ, प्रशांत पालवणकर, झाहीद दादरकर, अमोद बुटाला इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59048 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top