रत्नागिरी- मंदिर प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- मंदिर प्रवेश
रत्नागिरी- मंदिर प्रवेश

रत्नागिरी- मंदिर प्रवेश

sakal_logo
By

सैतवडेतील बौद्ध समाजमंदिरात
बहिष्कृत लोकांना मिळाला प्रवेश
रत्नागिरी, ता. १७ ः तालुक्यातील सैतवडे-बलभिमवाडीतील बौद्ध समाजाने आपल्याच काही बौद्ध बांधवांना २०११ पासून आजपर्यंत बहिष्कृत केले आहे. या बहिष्कृत बांधवांना बौद्ध समाजमंदिरामध्येही प्रवेश दिला जात नव्हता. अखेर डॉ. मयुरेश सुरेश मोहिते यांनी रत्नागिरीच्या दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) येथे दावा दाखल केला. डॉ. मोहिते यांच्या बाजूने वकील एस. एस. मोरे यांनी युक्तीवाद करून बहिष्कृत लोकांना मंदिरप्रवेशाचा हक्क मिळवून दिला. डॉ. मोहिते आणि त्यांचे इतर साठ ते सत्तर बांधवांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कळेकर आणि त्यांचे सहकारी यांच्या देखरेखीखाली सकाळी १०.४५ वा. सन्मानपूर्वक मंदिर प्रवेश करून बुद्ध सूत्रपठणाचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमांतर्गतच डॉ. मोहिते यांनी कोरोना कालखंडात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा बौद्ध समाजमंदिरात सन्मानही करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59049 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top