
आयी विकास सोसायटीवर शिवसेनेच्या पॅनेलचा विजय
आयी विकास सोसायटीवर
शिवसेनेच्या पॅनेलचा विजय
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १७ : आयी विकास सोसायटी निवडणुकीत शिवसेनेच्या पॅनेलने भाजपच्या पॅनेलचा सुफडा साफ केला. चेअरमन चंद्रकांत उर्फ अण्णा शिरोडकर यांच्या पॅनेलने १३ पैकी १३ ही जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली.
भाजपने सर्व ताकद लावूनही शिवसेना भाजपला भारी पडली. आमच्या मतदारांनी भाजपला मतदानातून सणसणीत उत्तर दिले आणि जुन्या संचालकांवरचा विश्र्वास पुन्हा सिद्ध केला, अशी प्रतिक्रिया शिरोडकर यांनी विजयानंतर व्यक्त केली. भाजपचे पदाधिकारी व जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश गवस यांनी आयी सहकारी सोसायटीत चेअरमन चंद्रकांत उर्फ अण्णा शिरोडकर यांच्या कारभारावर टीका केली होता. त्याला अण्णा शिरोडकर यांनी सर्व जागा जिंकून प्रत्युत्तर दिले.
शिवसेनेच्या पॅनलच्या सुरेश गवस, वासुदेव गवस, विजय गवस, अंकुश गवस, दिनेश हरवाळकर, फटी सावंत, चंद्रकांत शिरोडकर, प्रदीप शिरोडकर, अनिता सावंत, संजिता सावंत, संजय सावंत यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना धूळ चारत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. त्याआधी त्यांच्या पॅनलचे गुरूदास जाधव आणि श्रीपत गोसावी हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे तेरापैकी तेरा जागा जिंकून चंद्रकांत शिरोडकर यांच्या पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले. चंद्रकांत शिरोडकर व विजयी उमेदवारांचे उपतालुकाप्रमुख बबलू पांगम, कृष्णा पर्येंकर यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, भगवान गवस, रामदास मेस्त्री आणि अन्य शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59054 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..