
शौचालय बांधणीकरिता ऑनलाईन प्रक्रिया
शौचालय बांधणीकरिता
ऑनलाईन प्रक्रियाःठाकुर
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -२ अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना शौचालय बांधावयाचा आहे, अशा लाभार्थ्यांकरीता अनुदान मागणी प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. या प्रणालीचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यानी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विनायक ठाकुर यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम पुर्ण झाल्यावर १२ हजार प्रोत्साहन अनुदान लाभार्थ्यांस वितरीत करण्यात येते. यामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन लाभार्थी निश्चित करुन पंचायत समिती व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातुन केंद्राच्या वेबसाईटवर ऑनलाईन करण्यात येत होते. लाभार्थी निश्चित करुन शौचालय बाधकाम पुर्ण झाल्यावर त्या शौचालयाचा फोटो जिओ टॅग केल्यानंतर लाभार्थ्याला शौचालय प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात येत होते. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील ज्या कुंटुंबांकडे वैयक्तिक शौचालय अद्यापपर्यत नाहीत अशा लाभार्थीना आता ऑनलाईन प्रणालीव्दारे शौचालय प्रोत्साहन अनुदानाकरीता मागणी करता येणार आहे. यासाठी लाभार्थ्याने मोबाईल, कॉम्पुटर, सायबर कॅफे अथवा इतर सामान्य ऑनलाईन सेवेव्दारे SBM-G या संकेत स्थळावरुन अथवा http://sbm.gov.in/sbmphase२/homenew.aspx या लिंकव्दारे Citizen corner किंवा whats new या ठीकाणी जाऊन रजिस्टेशन करावयाचे आहे, केलेल्या नोंदणीची तपासणी करुन पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक शौचालय अनुदानाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील बांधकाम करावयाचे शिल्लक असलेले लाभार्थी यांनी प्रोत्साहन अनुदानाकरीता या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातुन आपली नाव नोंदणी करावी. याबाबतच्या अधिक माहिती करीता आपली ग्रामपंचायत, गटसंसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) पंचायत समिती किंवा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकुर यांनी केले आहे.
-----------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59057 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..