रत्नागिरी-रनपच्या प्रभाग रचनेविषयी अकरा हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रनपच्या प्रभाग रचनेविषयी अकरा हरकती
रत्नागिरी-रनपच्या प्रभाग रचनेविषयी अकरा हरकती

रत्नागिरी-रनपच्या प्रभाग रचनेविषयी अकरा हरकती

sakal_logo
By

निवडणूक चिन्‍ह वापरा
..
रत्नागिरी पालिकेसाठी ११ हरकती

प्रभाग रचना; २३ मेपर्यंत सुनावणी, एक प्रभाग वाढणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः रत्नागिरी नगरपालिकेत एक प्रभाग वाढलेला असून या बदललेल्या रचनेविषयी प्रशासनाकडे अकरा हरकती प्राप्त झालेल्या आहेत. यामध्ये काही जुन्या अर्जांचाही समावेश आहे. यावर २३ मे पर्यंत जिल्हाधिकाऱ्‍यांकडे सुनावणी होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पुढील कार्यवाहीला आरंभ झाला. यापूर्वी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार प्रभाग रचना नव्याने करण्यात येणार होती. त्यावर कार्यवाही केली जात होती; परंतु ही प्रक्रिया स्थगित केली गेली. त्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया सुरू झाली असून नव्याने केलेल्या प्रभाग रचनेसंदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्याची मुदत संपुष्टात आली असून आतापर्यंत ११ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. यामधील काही हरकती या मार्चपूर्वीच्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्‍यांकडे सुनावणी घेतल्यानंतर त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावयाचा आहे. ६ जुनला प्रभागाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. रत्नागिरी पालिकेतील एक प्रभाग वाढला असून दोन नगरसेवकांची भर पडली आहे. जुन्या यादीप्रमाणे पंधरा प्रभाग आणि तीस नगरसेवक होते. आता सोळा प्रभाग आणि ३२ नगरसेवक होणार आहेत. दोन जागा वाढल्यामुळे इच्छुकांच्या भाऊगर्दीतही वाढ होणार आहे.
---
चौकट
निवडणूक सप्टेंबरनंतर शक्य
पावसाळी भागातील निवडणुका या परिस्थितीचा विचार करुन घ्या, असे निर्देश न्यायालयाने दिल्यामुळे रत्नागिरीतील निवडणूक सप्टेंबरनंतरच होतील, असा अंदाज बांधला जात आहे. गणेशोत्सव झाला की पडघम वाजण्याची शक्यता आहे.
..
एक नजर..
६ जुनला प्रभागाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात
रत्नागिरी पालिकेतील एक प्रभाग वाढला
दोन नगरसेवकांची भर पडली
....
ग्राफ करावा
...
एक दृष्टिक्षेप..
जुन्या यादीप्रमाणे होते प्रभागः १५
नगरसेवक होतेः ३०
आता प्रभागः १६
नगरसेवक होणारः ३२

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59077 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top