
माजगावातील विहिरीत आढळले गव्याचे मृत पिल्लू
swt1721.jpg
22501
माजगावः मेटवाडा येथील विहिरीतून गव्याच्या मृत पिल्लाला बाहेर काढताना वन कर्मचारी.
माजगावातील ‘त्या’ विहिरीत
आढळले गव्याचे मृत पिल्लू
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः माजगाव-मेटवाडा येथील विहिरीत गव्याचे एक पिल्लू मृतावस्थेत तरंगताना आढळले. ही घटना घरमालकाच्या निदर्शनास आली. याच विहिरीतून सोमवारी (ता. १६) दोन पिल्लांना जीवदान देण्यात आले होते. एकाच वेळी तीन पिल्ले विहिरीत पडली असावी, त्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. वन विभागाच्या पथकाने त्या मृत पिल्लाला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात अंत्यसंस्कार केले.
माजगाव-मेटवाडा येथील एका बंगल्याच्या कुंपणात असलेल्या विहिरीत सोमवारी (ता. १६) दोन गवारेड्याची पिल्ले पडल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर वन विभागाच्या टीमने ग्रामस्थांच्या सहकार्याने मोहीम राबवत जीव धोक्यात घालून त्या दोन पिल्लांना सुखरूप बाहेर काढले व जंगलात सोडून दिले होते; मात्र आज सकाळी विहिरीतील पाणी पाहण्यासाठी गेलेल्या घर मालकांना अजून एक गव्याचे पिल्लू मृत अवस्थेत तरंगत्या स्थितीत दिसून आले. यानंतर त्यांनी याबाबत वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. वन विभागाच्या टीमने घटनास्थळी दाखल होत त्या मृत पिल्लाला विहिरीतून बाहेर काढले व नैसर्गिक अधिवासात अंत्यसंस्कार केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59081 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..