
उमेश पेंडुरकर यांना गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार
swt१७२२.jpg
L22502
उमेश पेंडुरकर
उमेश पेंडुरकर यांना गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. १७ : कोचरा पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुधन पर्यवेक्षक उमेश पेंडुरकर यांना गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत त्यांचे अभिनंदन होत आहे. जागतिक पशुवैद्यक दिन २०१६ करिता पशुसंवर्धन विभागातील गुणवंत पशुवैद्यकांना पुरस्कार प्रदान करणे अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक या सवर्गामध्ये गुणवंत पशुवैद्यक पुरस्कारासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
२० मे २२ रोजी सकाळी अकरा वाजता शरदचंद्रजी पवार सभागृह जिल्हा परिषद पुणे येथे पशुसंवर्धन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतचे लेखी पत्र डॉ. धनंजय परकाळे यांनी उमेश पेंडुरकर यांना दिले आहे. उमेश पेंडुरकर यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये पशुधन पर्यवेक्षक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे. या कामाची दखल पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांनी घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59088 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..