(पान 3 साठीमेन) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

(पान 3 साठीमेन)
(पान 3 साठीमेन)

(पान 3 साठीमेन)

sakal_logo
By

वाशिष्ठी नदीः लोगो
..
-rat17p32.jpg
22480
ः चिपळूण ः पालिकेच्या वाहनतळाच्या विरुद्ध बाजूस वाशिष्ठि नदीकाठावरच भराव केल्याने नदी आणखी अरुंद झाली आहे.
-----------
गाळ काढला, काठावरच का ठेवला?

पात्र आणखी अरुंद; पावसाळ्यापूर्वी न उचलल्यास गाळ नदीतच
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः गतवर्षीच्या महापुरानंतर वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, अद्याप ते पूर्ण झाले नसून ५० टक्केच गाळ काढण्यात आला आहे. काढलेला गाळ अनेक ठिकाणी वाशिष्ठी नदीच्या काठावरच रचून ठेवलेला दिसत आहे. यामुळे अतिवृष्टीत गाळ पुन्हा नदीत वाहून जाणार आहे. त्यामुळे केलेल्या कामाचा उपयोग काय? असा सवाल नागरिक व्यक्त करत आहेत.
चिपळूण बचाव समितीने बेमुदत उपोषण करून पूरप्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. केंद्र स्तरापर्यंतदेखील पाठपुरावा करण्यात आला. शासनाने गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध केला; मात्र त्यानंतर बचाव समितीची पकड ढिली झाली आहे. या कामाचा आवश्यक तेवढा पाठपुरावा समितीकडून झाला नसल्याचे त्या कामातून पुढे येत आहे. ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी काम झाले आहे. मध्यंतरी डिझेल चोरीचा प्रकार उघडकीस आला. एका बाजूला शासनाने सर्व यंत्रणा आणि डिझेल दिलेले असूनही त्या प्रमाणात गाळाचे काम झाले नाही, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. वाशिष्ठी आणि शिवनदीच्या पात्रालगत अनेक ठिकाणी किनाऱ्यावरच गाळ ठेवलेला दिसून येत आहे.
नाम फाउंडेशननेदेखील मोठ्या उत्साहाने शिवनदीतील गाळ काढण्याचे काम सुरू केले. शिवनदी किनाऱ्यावरील गाळ उचलला जात आहे. वाशिष्ठी किनारी अनेक ठिकाणी नदीकिनारीच गाळाचा भराव करण्यात आला आहे. तो नेण्यासाठी कोणी तयार नाही व शहर परिसरात गाळ टाकण्यासाठी जागा शिल्लक नाही, अशी कारणे सांगितली जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम झाले असले तरी प्रत्यक्षात काढलेला गाळ पुन्हा नदीपात्रात जाणार आहे. त्यामुळेच चिपळूणचा पुराचा धोका टळेल की नाही, याबाबत आतातरी कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. बचाव समितीने सुरवातीच्या काळामध्ये या कामावर लक्ष केंद्रित केले होते; मात्र त्यानंतर बचाव समितीचे कार्यकर्ते कामाचा पाठपुरावा करण्यामध्ये कमी पडले. यामुळे किनाऱ्यावर असलेला गाळ पुन्हा नदीपात्रात जाऊन जैसे थे परिस्थिती होणार आहे.
..
चौकट
तत्काळ निर्णय घ्यावा
चिपळूण शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या शिव नदीकिनारी असणारा गाळ पालिकेच्या माध्यमातून उचलला जावा, अशी मागणी होत आहे. याबाबत मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी आपत्कालीन योजनेतून तत्काळ निर्णय घ्यावा. तसेच खाटीक गल्ली येथील शिवनदीचे पात्र रुंद व थोडे खोल करून त्या ठिकाणचे अडथळे दूर करावेत. याच भागातील किनाऱ्यालगतचा गाळ तातडीने काढला जावा, अशी मागणी होत आहे. दुसऱ्या बाजूला जलसंपदा विभागाने नदीतील गाळ व शिल्लक असलेले काम तातडीने पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे,अशी मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59138 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top