तमाशा मंडळांची बारी; दर्दी रसिकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तमाशा मंडळांची बारी; दर्दी रसिकांची गर्दी
तमाशा मंडळांची बारी; दर्दी रसिकांची गर्दी

तमाशा मंडळांची बारी; दर्दी रसिकांची गर्दी

sakal_logo
By

काल फोटो सोडला
..
at18p6.jpg
22607
पालेकोंड ः गावाच्या वार्षिक ग्रामोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सादरीकरण करताना तमाशा कलावंत व लक्षणीय उपस्थिती.
..........
तमाशा मंडळांची बारी; दर्दी रसिकांची गर्दी

पालेकोंड ग्रामोत्सवात कला संवर्धनाचे पाऊल; चार तमाशा मंडळांचा अभिनव उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १८ ः कोकणातील जाखडी तमाशांचे संवर्धन व गुणात्मक विकासाकरिता तालुक्यातील दोन गावांतील चार तमाशा मंडळातील कलाकारांनी केवळ आपल्या कलेचे व श्रृंगाराचे कला आविष्काराचे सादरीकरण करत लोप पावत चाललेल्या या कलेकडे तमाशा कलावंत तिच्या संवर्धन व विकासाच्यादृष्टीने पाहत असल्याची साक्ष दिली. पालेकोंड येथे तमाशा कलेचे संवर्धन करण्याचा अभिनव उपक्रम १५ मे रोजी राबवण्यात आला. त्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
जाखडी तमाशात हारजीतचा फैसला व बदलत्या काळातील द्वैअर्थी संवाद दर्दी रसिकांना भावत नाही. बदलत्या काळाला साजेसे परंतु परंपरांना छेद न देता आपल्या कलेचे तमाशा कलावंतानी केलेल्या सादरीकरणाने कलाक्षेत्रात केलेला हा नवा प्रयोग कलेच्या प्रसाराबरोबरच तमाशाच्या पारंपरिक मांडणीस बळ देणारा ठरला. आयोजकही समाधानी दिसून आले. रविवारी (ता. १५) मे रोजी पालेकोंड गावाच्या वार्षिक ग्रामोत्सवाचे औचित्य साधून पाले व तुळशी गावातील चार तमाशा मंडळांनी प्रत्येक दीड तासांची बारी करत आपल्याकडे असलेल्या सर्वोत्तम तमाशा कलेचे सादरीकरण केले. तमाशा उभा करण्यासाठी करावे लागणारे कष्ट व त्यामागचे न परवडणारे अर्थकारण यामुळे गेल्या दशकात वर्षोनुवर्षे तमाशा कला जोपासणाऱ्या तमाशा मंडळाची झालेली पिछेहाट व ती नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती.
समाजानेही तमाशा ही कला जगण्याच्यादृष्टीने या कलेस लोकाश्रय देण्याची गरज आहे. आपल्या नेहमीच्या कार्यक्रमांसाठी हजारो रुपये खर्च करताना काही रक्कम तमाशा कलावंतांवर खर्च करत कलाकारांना सातत्याने व्यासपीठ मिळेल, असा प्रयत्न केला पाहिजे. भैरवनाथ तमाशा मंडळ तुळशी, जननीमाता तमाशा मंडळ पालेवरची आळी आणि नवतरुण उत्साही तमाशा मंडळ पालेखालची आळी व नवतरुण तमाशा मंडळ पालेकोंड यांनी अतिशय सुंदर आणि लयबद्ध असा कलात्मक कार्यक्रम सादर करून पालेकोंड रंगमंचाचा गौरव कलावंतांनी वाढवला. आपल्या निस्सिम प्रेमाची अनुभूती देणाऱ्या सहकार्यामुळे भरून पावल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ, महिला मंडळ पालेकोंड यांनी कार्यक्रमानंतर दिली.
-------
चौकट
स्पर्धेच्या पलीकडे
स्पर्धेच्या पलीकडे जाऊन कला टिकली पाहिजे व ती आहे, तशी भावी पिढ्यांकडे हस्तांतरित होऊन वाढलीही पाहिजे, या हेतूने हा प्रयोग करण्यात आला. तमाशा कलावंतांची युवापिढीही विवेकी व विचारी असून, प्रेक्षकांनी जे हवे ते देणार आहे, याची साक्ष ही या निमित्ताने मिळाली. पालेकोंड गावात वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने घालण्यात आलेला हा नवा पायंडा आता वेगळा ट्रेंड बनावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
..
चौकट
प्रबोधनाचे विषय पारंपरिक मांडणीने ऐकण्यात रस
कार्यक्रमाअभावी कलाकारांना आत्मचिंतन करण्याची मोठी संधी गेल्या दोन वर्षांनी दिली. यात तमाशा कलेत आध्यात्मिक श्रृंगाररस व पारंपरिक कलेची मांडणी ही सवाल-जवाब सामन्यांच्या पलीकडे असल्याची तसेच दर्दी कला रसिक प्रेक्षकांना तमाशा या लोककलेत हा कलाविष्कार व प्रबोधनाचे विषय पारंपरिक मांडणीने ऐकण्यात रस असल्याचे दिसून आले.