
पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाची सांगता
rat18p7.jpg
22615
रत्नागिरी ः मालवण येथे झालेल्या पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभाला उपस्थित अभिनेत्री अलका कुबल, अभिनेता विजय पाटकर, प्रकाश जाधव आदी.
----
पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाची सांगता
मालवणात आयोजन; कोकण संस्कृती, वैभव जगभरात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः सिंधुरत्न कलावंत मंचातर्फे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आयोजित केलेल्या पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचा सांगता समारंभ आणि पारितोषिक वितरण सोहळा मालवण येथील मामा वरेरकर सभागृहात झाला. या चित्रपट महोत्सवात विवेक दुबे दिग्दर्शित फनरल चित्रपट सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मानकरी ठरला तर या चित्रपटासाठी अभिनेता आरोह वेलणकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा व दिग्दर्शक विवेक दुबे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.
अक्षया गुरवला रिवणावायली चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटासाठी विजेत्यांना पुरस्कार प्रदान करून पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाची सांगता करण्यात आली. पहिला कोकण चित्रपट महोत्सव ९ ते १४ मे या कालावधीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे झाला. मराठीतील ३८ चित्रपट यात सहभाग घेतला होता. त्यातील १४ चित्रपटांची परिक्षकांनी अंतिम फेरीसाठी निवड केली होती. त्यातून विजेत्यांची घोषणा करण्यात आली होती. सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, प्रकाश जाधव, ज्येष्ठ अभिनेत्री आणि संस्थेच्या उपाध्यक्षा अलका कुबल यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन अभिनेता दिगंबर नाईक यांनी केले.
..
चौकट
कलासंस्कृतीला वेगळे वळण देणारा महोत्सव
कोकण चित्रपट महोत्सव कोकणातील स्थानिक कलाकारांना संधी देणारा उत्तम मंच ठरावा, अशी अपेक्षा सिंधुरत्न कलावंत मंच संस्थेचे अध्यक्ष अभिनेता विजय पाटकर यांनी व्यक्त केली. गुणी आणि उमेदीचे कलाकार प्रत्येक भागात असतात. केवळ पुणे-मुंबई इथेच सांस्कृतिक घडामोडी केंद्रित होऊन चालणार नाही. या उद्देशाने आम्ही या कोकण चित्रपट महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली असून, या माध्यमातून इथल्या कलाकारांना वाव मिळेल व कोकणातील सांस्कृतिक वैभव जगभरात दाखवतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कोकण चित्रपट महोत्सव कोकणातील कलासंस्कृतीला वेगळे वळण देणारा ठरेल, असा विश्वास झी च्या मराठी क्लस्टरचे चीफ ऑफिसर बवेश जानवलेकर यांनी व्यक्त केला.
------
एक नजर..
कोकण चित्रपट महोत्सवः ९ ते १४ मे दरम्यान
रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे आयोजन
मराठीतील चित्रपट यात सहभागीः ३८
त्यातील चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवडः १४
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59286 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..