राजापूर ः खत शेताच्या बांधावर पोचणार कधी? कसे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः खत शेताच्या बांधावर पोचणार कधी? कसे?
राजापूर ः खत शेताच्या बांधावर पोचणार कधी? कसे?

राजापूर ः खत शेताच्या बांधावर पोचणार कधी? कसे?

sakal_logo
By

22659ः संग्रहीत
...
खत शेताच्या बांधावर पोचणार कधी?

राजापुरात बळिराजा चिंतेत; युरियाला मागणी सर्वाधिक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः मॉन्सूनला सुरवात झाल्यानंतर अनेकवेळा; विशेषतः कोकणामध्ये रस्त्यांसह वाहतुकीचे प्रश्‍न निर्माण होतात. त्यातून शेताच्या बांधावर खत पोचण्यामध्ये अडथळे येतात. त्यामुळे मॉन्सूनला सुरवात होण्यापूर्वी शेतकऱ्‍यांकडून खत खरेदी केले जाते. त्याप्रमाणे खत आणि बियाणे खरेदीची लगबग सुरू असताना मात्र युरियासह अन्य खतांच्या अनुपलब्धतेच्या समस्येला शेतकऱ्‍यांना सामोरे जावे लागत आहे. बियाणे मिळतेय; मात्र खत कधी मिळणार आणि थेट शेताच्या बांधावर पोचणार कधी अन् कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्‍यांना सतावत आहे.
खरीप हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुमारे २२ हजार मेट्रिक टन खताची मागणी कृषी विभागातर्फे करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे १४ हजार मेट्रिक टन खताला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्या मंजुरीप्रमाणे खतवितरणाचे जिल्ह्यामध्ये कृषी विभागातर्फे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये आजपर्यंत विविध प्रकारचे २३३ मेट्रिक टन खत उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.
येत्या काही दिवसांमध्ये मॉन्सूनला सुरवात होणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्‍यांकडून आतापासून शेतीच्या हंगामाची जोरदार तयारी केली जात आहे. त्यामध्ये भातबियाणे खरेदीस खत खरेदी आणि विविध प्रकारची शेती अवजारे खरेदी करण्याची लगबग शेतकऱ्‍यांची सुरू झाली आहे. आधीच खतांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. त्याही दराने खरेदी करायची तयारी आहे; मात्र ते उपलब्ध कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
....
चौकट
उर्वरित खत येणार कधी?
शेतकऱ्‍यांकडून मोठ्या प्रमाणात युरिया खताचा वापर केला जातो. त्यामुळे अन्य खतांच्या तुलनेमध्ये युरिया खताची शेतकऱ्‍यांकडून जास्त मागणी केली जाते. त्याप्रमाणे कृषी विभागातर्फे युरिया खताचे नऊ हजार टन खत वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी जिल्ह्यामध्ये केवळ ६२ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. उर्वरित खत येणार कधी आणि शेताच्या बांधावर पोचणार कधी, असा प्रश्‍न भेडसावत आहे.
............
चौकट
अनेक वेळा रस्त्यांसह वाहतुकीचा प्रश्‍न
भौगोलिकदृष्ट्या कोकणातील उंच-सखल आणि डोंगराळ भाग असल्याने प्रत्यक्षात पावसाळ्यास सुरवात झाल्यानंतर या कालावधीमध्ये अनेक वेळा रस्त्यांसह वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्‍यांकडून मॉन्सूनला सुरवात होण्यापूर्वी बियाणे, अवजारे आणि विशेषतः खतांची खरेदी केली जाते; मात्र जिल्ह्यामध्ये खते; विशेषतः युरिया मागणीच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध झाले आहे. हे खत नेमके कधी उपलब्ध होणार, याबाबतही अनिश्‍चितता आहे. त्यामुळे हे खत उपलब्ध होणार कधी आणि शेताच्या बांधावर पोचणार कधी, असा प्रश्‍न शेतकऱ्‍यांना सतावत आहे.
...
चौकट
दृष्टिक्षेपात रत्नागिरी जिल्हा
खताचा प्रकार* खत मागणी* खत मंजुरी* खत पुरवठा
युरिया*१२९९१*९०२०*६२.०१
डीएपी*१२३६*७२०* -
एमओपी*१०७४*६५०*-
एनपीके*५७७६*३५१०*१७१
एसएसपी*१९६९*७४०*-
एकूण*२२१४६*१४६४०*२३३.०१
..
एक नजर..
जिल्ह्यासाठी २२ हजार मेट्रिक टन खताची मागणी
१४ हजार मेट्रिक टन खताला शासानाकडून मंजुरी
आजपर्यंत विविध प्रकारचे २३३ मेट्रिक टन खत उपलब्ध
युरिया खताचे नऊ हजार मेट्रिक टन खत वितरणाचे नियोजन
जिल्ह्यामध्ये केवळ ६२ मेट्रिक टन खत उपलब्ध

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59304 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top