वेंगुर्ले वाचनालय सभा २१ रोजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्ले वाचनालय सभा २१ रोजी
वेंगुर्ले वाचनालय सभा २१ रोजी

वेंगुर्ले वाचनालय सभा २१ रोजी

sakal_logo
By

वेंगुर्ले वाचनालय
सभा २१ रोजी
वेंगुर्लेः वेंगुर्ले नगरवाचनालय या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा २१ ला सायंकाळी ४ वाजता संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगावकर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
-------------------
फलक, रिझर्व्हेशन
चार्ट जागा पूर्ववत
कणकवलीः येथील रेल्वे स्टेशनवरील रेल्वेच्या डब्यांची स्थिती दर्शविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीप्रमाणे फलाट नंबर १ वर प्रवाशांसाठी उपलब्ध करण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने केली आहे. याबाबत ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी लक्ष वेधले होते. रेल्वेच्या डब्यांची स्थिती दर्शविणारा फलक व रिझर्व्हेशन चार्ट फलाट क्रमांक १ वर पूर्ववत केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली. त्याबद्दल क्षेत्रीय प्रबंधक रवींद्र आर. कांबळे यांचे संघटनेच्यावतीने आभार मानण्यात आले. दरम्यान, खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवून रस्ता व्यवस्थित करण्यात येईल व सरकता जीना दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही रवींद्र आर. कांबळे यांनी दिली.
--------------------
अवधूत मंदिरात
आजपासून कार्यक्रम
मालवणः मसुरे-गावठणवाडी येथील समर्थ अवधूत महाराज यांच्या समाधी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम १९ ते २० मे या कालावधीत आयोजित केला आहे. १९ ला सकाळी ८ वाजता धार्मिक विधी व कलश पूजन, सायंकाळी ७.३० नंतर पंचक्रोशीतील भजने, २० ला सकाळी ७ वाजता धार्मिक विधी कलशपूजन, ८:३० वाजता शिखर कलश स्थापना, दुपारी १२ वाजता महाआरती, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता भजने, रात्री ९ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मसुरे देऊळवाडा ग्रामस्थ गावठणवाडी व अवधूत महाराज भक्तगण यांच्यावतीने केले आहे.
------------------
मालवणात उद्या
रेकॉर्ड डान्स
मालवणः बाल गोपाळ मित्रमंडळ मेढा आयोजित त्रैवार्षिक महापूजेनिमित्त २० ला मौनिनाथ मंदिर मेढा, मालवण याठिकाणी १५ वर्षावरील मुलांसाठी सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम विजेत्यास ५ हजार पये, द्वितीय ३ हजार रूपये, तृतीय २ हजार रूपये, उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय विजेत्यास प्रत्येकी १ हजार रूपये देण्यात येणार आहेत. सहभाग करीता या क्रमांकावर संपर्क साधावा.
-------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59310 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top