चिपळूण ः विजेसाठी नागरिकांनी महावितरणमध्ये रात्रभर मांडला ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः विजेसाठी नागरिकांनी महावितरणमध्ये रात्रभर मांडला ठिय्या
चिपळूण ः विजेसाठी नागरिकांनी महावितरणमध्ये रात्रभर मांडला ठिय्या

चिपळूण ः विजेसाठी नागरिकांनी महावितरणमध्ये रात्रभर मांडला ठिय्या

sakal_logo
By

ratchl185.jpg
L22650
चिपळूण ः गोवळकोट नागरिकांनी महावितरण कार्यालयात रात्री मांडलेला ठिय्या.
...
महावितरणमध्ये नागरिक पहाटे धडकले, रात्रभर ठिय्या

गोवळकोट खेंडमधील वीजपुरवठा खंडित; सकाळी पुरवठा पूर्ववत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः गेल्या काही दिवसात उष्म्याचे प्रमाण वाढलेले असतानाच विजेची मागणीही वाढलेली आहे. अशातच मंगळवारी (ता.१७ ) रात्री शहरातील गोवळकोट व खेंड परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी पहाटे 3 वा. थेट महावितरण कार्यालय गाठून तेथेच ठिय्या मांडला. अखेर बुधवारी सकाळी या भागातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.
सध्या उष्म्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच बच्चे कंपनीसह आबालवृद्धदेखील गरमीने अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे विजेची मागणी सर्वत्र सातत्याने वाढतीच आहे. ही परिस्थिती असतानाच गोवळकोट रोड येथील श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या कमानीलगत व गोवळकोट मदरसा येथील विद्युत रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने या भागातील वीजपुरवठा रात्री ११ वाजल्यापासून खंडित झाला होता. या वेळी काही नागरिकांनी महावितरणकडे दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाविरणमधील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मोबाईलवर फोन करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊन विचारणा केली; परंतु त्यानंतरही कोणत्याही हालचाली न दिसून आल्याने अखेर जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष साजीद सरगुरोह व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटे ३ वाजल्यापासून कार्यालयातच ठिय्या मांडला. महावितरणमध्ये रात्री ठिय्या मांडताना साजिद सरगुरोह यांच्यासह अल्ताफ बेबल, वहाफ वावेकर, राहुल पवार, प्रदीप कांबळे व सहकारी उपस्थित होते.
--------------------------------
चौकट
ऑक्सिजन यंत्रणेला बॅटरी जोडली
गोवळकोट येथील एक महिला रुग्ण ऑक्सिजनवर असल्याने तत्काळ वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली; मात्र पहाटेपर्यंत पूर्ववत सुरू न झाल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी ऑक्सिजन यंत्रणेला बॅटरी जोडून संबंधित महिला रुग्णाला मदत केली. त्यानंतर सकाळी ६ च्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.
..............
कोट
पावसाळ्यात किंवा आपत्ती परिस्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास तो मान्य करू शकतो; मात्र तशी कोणतीही परिस्थिती नसताना ४ ते ५ तास वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यावर वेळीच उपाययोजना केली जात नाही किंवा अशा परिस्थितीत कोणाकडे संपर्क साधावा, याचेही नियोजन महावितरणने केलेले नाही.
- साजिद सरगुरोह, गोवळकोट चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59316 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top