नांदगावमधील रस्ता प्रश्‍नी उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगावमधील रस्ता प्रश्‍नी उपोषण
नांदगावमधील रस्ता प्रश्‍नी उपोषण

नांदगावमधील रस्ता प्रश्‍नी उपोषण

sakal_logo
By

swt१८५.jpg
२२६५५
कणकवली : येथील प्रांत कार्यालयात नांदगाव पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधींनी महामार्ग प्रश्‍नांबाबत चर्चा केली.

नांदगावमधील रस्ता प्रश्‍नी उपोषण
ग्रामस्थांचा इशारा : समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष, प्रांत कार्यालयात बैठक
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.१८ : नांदगांव तिठा आणि ओटव फाटा या ठिकाणी दुसऱ्या बाजूचा सेवा रस्ता तातडीने तयार करा. पावसाचे पाणी घरांत जाऊ नये यासाठी पुढील पंधरा दिवसांत उपाययोजना करा. ही कामे आठवडाभरात न झाल्‍यास २५ मेपासून नांदगांव पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रांत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्‍याचा इशारा नांदगांव, असलदे सरपंचासह ग्रामस्थांनी दिला.
महामार्गावरील नांदगाव येथील उड्डाणपुलावर अचानक गतीरोधक उभारण्यात आला. या गतिरोधकावरून दुचाकी कोसळून झालेल्‍या अपघातात मंगळवारी (ता. १७) एका महिलेचा मृत्‍यू झाला होता. या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी नांदगाव पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आज प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेतली. यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, भाई मोरजकर, कमलेश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपसरपंच नीरज मोर्ये आदी उपस्थित होते.
नांदगाव आणि असलदे सरपंचांनी नांदगाव आणि ओटव फाटा येथे एका बाजूने सेवा रस्ते तयार केलेले नाहीत. याबाबत भूसंपादन प्रक्रिया तसेच महामार्ग विभागाकडून गेले दोन वर्षे कार्यवाही झालेली नाही. एका बाजूचा सेवा रस्ता नसल्‍याने सतत अपघात होत आहेत. त्‍यामुळे तातडीने सेवा रस्ते आणि गटाराची बांधकामे करा, असा इशारा देण्यात आला.
महामार्गाच्या प्रश्‍नाबाबत चर्चा करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणचे अभियंता देविदास कुमावत यांच्याशी संपर्क साधण्यात आला, मात्र ते राजापूरला असल्याने सेवा रस्ते या विषयावर पुन्हा बैठक घेऊन चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी, कणकवलीहून देवगडला व नांदगाव तिठा येथे जाणारी वाहने विरुध्द दिशेने न्यावी लागत आहेत. तसेच मुंबईच्या दिशेने जाणारी एस. टी. वाहतूकही नांदगाव तिठा येथे न येता पुलावरुन जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एस. टी. चा संप होता तोपर्यंत ठीक होते. आता मात्र लोकांना जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांना कोळंबा मंदिर समोर पुल चालू होते येथे उतरले जाते. यामुळे तेथून वयोवृध्द प्रवाशांना पायपीट करावी लागत असल्‍याची बाब प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. ही कामे वेळेत न झाल्यास २५ मे रोजी सर्व ग्रामस्थांसहीत प्रातं कार्यालय कणकवलीसमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा नांदगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी राजमाने यांना दिला.

चौकट
नीतेश राणेंचा आज पाहणी करणार
नांदगाव येथील महामार्गाच्या समस्यांबाबत आमदार नीतेश राणे यांनी प्रांताधिकांऱ्यांशी चर्चा केली. यानंतर उद्या (ता. १९) महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नांदगाव परिसराची आपण पाहणी करणार आहोत. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून येथील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यवाही केली जाणार असल्‍याचे श्री. राणे यांनी स्पष्‍ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59317 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top