
खेड ः आठवडा बाजारात पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीसाठी गर्दी
फोटो rat18p15.jpg
22657
खेड ः भरणे येथील आठवडा बाजारात भर दुपारी खरेदीसाठी आलेला ग्राहकवर्ग.
...
बाजारात खरेदीसाठी गर्दी; बेगमीची तयारी
भरणेत मोठी उलाढाल; महागाइने गृहिणींचे गणित कोलमडले
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १८ ः पावसाळा तोंडावर आल्याने तसेच सामान्यांचा आधार असलेली लालपरी हळूहळू सुरू झाल्याने आणि कोरोनाचे निर्बंध हटवल्यामुळे आठवडा बाजार गजबजू लागले आहेत. खेड तालुक्यातील सगळ्यात मोठा भरणे येथील आठवडा बाजारदेखील ग्राहकांच्या गर्दीने फुलू लागला आहे. पावसाळा तोंडावर आल्याने आठवडा बाजारात बेगमीच्या खरेदीसाठी एकच गर्दी दिसून येत आहे; मात्र यंदा महागाईच्या उच्चांकामुळे भाज्या व मसाल्याच्या पदार्थांच्या दरात वाढ झाल्यामुळे गृहिणींचे बजेट चांगलेच कोलमडले आहे.
सर्वच भाजीपाल्यावर महागाईंचा परिणाम दिसून येत आहे. बाजारात छोट्या कांद्याचा दर किलोमागे १५ -२० रुपये आहे तर मोठ्या कांद्याचा दर किलोमागे २०-२५ रुपये इतका आहे. त्याप्रमाणे बटाटा २८-३५ रुपये किलो आहे तर लसूण किलोमागे ५०-६० रुपये आहे. जेवणात सर्रास वापरला जाणाऱ्या टोमॅटोचा दर किलोमागे ६० रुपये इतका वाढला आहे तर बहुतांश पदार्थात हमखास वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीरीची जुडी २५-३० रुपये इतकी झाली आहे. भेंडी, कारले, वांगी, मिरची (हिरवी) यांचा दर ४०-५० रुपये प्रतिकिलो आहे तर सध्या चर्चेत असलेल्या लिंबाचा दर आकारमानानुसार असून, १० ला ५ लहान लिंबं तर मोठी लिंबे २०-२५ रुपयाला पाच अशी आहेत.
..
चौकट
चेवनी, म्हाकूळ आदी माश्यांना मोठी मागणी
पावसाळ्यात लागणाऱ्या मसाल्यातील सुकी मिरची बाजारात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. त्यामध्ये प्रकारानुसार किलोमागील दरात फरक असून, बेडगी मिरची २५०, संकेश्वरी मिरची २२०, काश्मिरी मिरची ३२०- ४०० रुपये असा आहे तर सुक्या खोबऱ्याचा दर किलोमागे १५०-१८० दरम्यान आहे. पावसाळ्यात सुक्या मच्छीवरती खवय्यांचा जोर असतो. त्यामुळे ती घेण्यासाठी नागरिकांची अधिक गडबड या वेळी आठवडा बाजारात दिसून आली. त्यामध्ये सुका बोंबील, कोलिम, आंबडकाड, चेवनी, म्हाकूळ आदी माश्यांना मोठी मागणी आहे.
---------------
ग्राफ करावा
एक नजर..
कांद्याचा दर किलोमागे ः२५ रुपये
बटाटा किलो ः २८ रूपये
लसूण किलोमागेः ६० रूपये
टोमॅटोचा दर किलोमागेः ६० रुपये
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59322 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..