कणकवली : गटार बांधकाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : गटार बांधकाम
कणकवली : गटार बांधकाम

कणकवली : गटार बांधकाम

sakal_logo
By

L22674
फोटो :kan१८६.jpg
कणकवली : शहरातील हॉटेल मंजुनाथ परिसरातील गटाराचे काम आजपासून सुरू करण्यात आले.
--------------------

कणकवलीतील हॉटेल मंजुनाथ समोरील गटाराच्या कामाला सुरुवात

कणकवली, ता.१८ : शहरातील हॉटेल मंजुनाथ समोर गेले दोन वर्षे अपूर्ण स्थितीत असलेल्या गटाराच्या बांधकामाला आजपासून सुरवात करण्यात आली. या प्रश्‍नी नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार दिलीप बिल्डकॉन या एजन्सीने अखेर प्रत्यक्षात हॉटेल मंजुनाथ समोरील गटाराचे बांधकाम आज बुधवारपासून सुरू केले.
या ठिकाणी गटाराचे काम अर्धवट स्थितीत ठेवल्यामुळे संपूर्ण पाणी वाटेवर येत होते. तसेच त्याचा जनतेला त्रास सहन करावा लागत होता. त्‍यामुळे नगरसेवक श्री. परुळेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची तातडीने दखल घेत महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसांत काम सुरू करण्याचे लेखी पत्र श्री.परुळेकर यांना दिले होते. तर आज हायवे ठेकेदाराकडून या गटाराकरिता लागणाऱ्या स्टीलचे स्ट्रक्चर तयार करून आणण्यात आले. तसेच गटार आणि त्‍यावरील फुटपाथचे काम सुरू करण्यात आले.
------------------

सरकारे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59331 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top