
रेवतळे येथील रस्त्याचे नुतनीकरण
swt188.jpg
22678
रेवतळे ः येथील नूतनीकरण झालेल्या रस्त्याची पाहणी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत यांनी केली.
रेवतळे येथील
रस्त्याचे नुतनीकरण
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : शहरातील रेवतळे येथील नंदू गवंडी घर ते चंडिका मांड रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी स्थानिकांतून करण्यात येत होती. त्यानुसार पालिकेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या कामाला २५ लाख रुपये मंजूर केले असून या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. या कामाला माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन हे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेतले. या कामासाठी यतीन खोत यांनी पाठपुरावा केला. या पाहणीवेळी शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59334 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..