चिपळूण ः महावितरणच्या नावे ग्राहकांना बनावट कॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः महावितरणच्या नावे ग्राहकांना बनावट कॉल
चिपळूण ः महावितरणच्या नावे ग्राहकांना बनावट कॉल

चिपळूण ः महावितरणच्या नावे ग्राहकांना बनावट कॉल

sakal_logo
By

महावितरणच्या नावे ग्राहकांना बनावट कॉल!

वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी; चिपळूणकर त्रस्त
चिपळूण, ता. १८ ः ''आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज रात्री ९.३० वा. आपला वीजपुरवठा खंडित करणार आहे. त्यामुळे ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट ''एसएमएस'' वीज ग्राहकांना पाठवण्यात येत आहेत. चिपळूणमध्ये असे बनावट मेसेज काही नागरिकांना प्राप्त झाले आहेत. अशा प्रकारचे कोणतेही ''एसएमएस'' महावितरणकडून पाठवण्यात येत नाहीत. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद अथवा उत्तर देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
चिपळूण शहरातील लोकांना यापूर्वी ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार वेळोवेळी घडले आहेत. त्यात आता महावितरणच्या नावे गंडा घालण्याचा प्रकार सुरू झाला आहे. शहरातील अनिल जाधव यांना अशा प्रकारचे एसएमएस आले होते. त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर गुगल पे द्वारे पैसे भरण्याची मागणी करण्यात आली. हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर जाधव यांनी फोन कट केला. त्यानंतर जाधव यांनी महावितरणची संपर्क साधला. वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून पाठवण्यात येणाऱ्या परंतु महावितरणशी संबंधित ''एसएमएस'' किंवा व्हॉटस्ॲप मेसेज किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून एखादी लिंक पाठवण्यात आली असेल तर दुर्लक्ष करावे. अन्यथा, यामधून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांनाच सिस्टीमद्वारे एसएमएस पाठवण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी हा एमएसईडीसीएल असा आहे. कोणालाही कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळवले जात नाही.
.......
महावितरणकडून फक्त एसएमएस
महावितरणकडून केवळ एसएमएसद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटररीडिंग पाठवण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम आदी माहिती पाठविण्यात येते.
- कैलास लवेकर, कार्यकारी अभियंता महावितरण चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59368 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top