
प. महाराष्ट्राच्या धर्तीवर आंबे खरेदी केंद्रांची गरज
आंबा चित्र वापरा
..
प. महाराष्ट्राच्या धर्तीवर आंबे खरेदी केंद्रांची गरज
प्रत्येक तालुक्यात आंबा बाजार; खुल्या पद्धतीने व्यवहार शक्य
रत्नागिरी, ता. १८ ः आंबे विक्री केंद्र उभारण्यात येणार आहेत, ही समाधानाची बाब आहे. मात्र, वास्तविक गरज आहे, ती आंबे खरेदी केंद्राची, अशी सूचना अभ्यासक मुकुंद गोंधळेकर यानी केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आंबा बाजार स्थापन करण्याची गरज असल्याचे त्यानी निदर्शनास आणून दिले आहे.
हापुस आंबे विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात आंबे विक्री केंद्र उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती देताना ॲड. अनिल परब आणि ऊच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत सूचना केली असून लवकरच याचे नियोजनही केले जाणार आह. मात्र, आंबे खरेदी केंद्र उभारा, अशी सूचना करताना गोंधळेकर यांनी, यासाठी पश्चिम महाराष्ट्राचा कित्ता गिरवावा, असे म्हटले आहे. पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी (बहुतांशी प्रत्येक तालुक्यात) कृषी उत्पन्न बाजार व कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. गावोगावीचे शेतकरी त्यांनी उत्पादित केलेली फळे व इतर शेतमाल विक्रीसाठी स्थानिक कृषि उत्पन्न बाजारात पाठवितात. याच पध्दतीने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आंबा बाजार स्थापन करण्याची गरज आहे. या तालुका पातळीवरील आंबा बाजारात जिल्ह्यातील आंबा उत्पादक आपला माल विक्रीसाठी आणतील व बाजारातील व्यापारी आंबे खरेदी करतील. खुले लिलाव पद्धतीने व्यवहार झाल्यास आंबा उत्पादकाला योग्य भाव मिळेल व व्यवहार आंबा उत्पादकाच्या समक्ष होईल. स्थानिक बाजारात आंबे विक्री झाली तर पॅकिंग व वाहतुक खर्चाचा आंबा उत्पादकावरील भार कमी होईल. जिल्ह्यातील आंबा बाजारात आंबा खरेदी करणारे व्यापारी नंतर, ग्रेडींग व पॅकिंग करून हा माल विविध शहरांत विक्रीसाठी पाठवितील.
..
चौकट
दलाल देईल, त्या रकमेवर समाधान..
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश आंबे विक्रीसाठी वाशी (नवी मुंबई) बाजारात पाठविले जातात. वाशी बाजारातील व्यवहार आंबा उत्पादकाच्या समक्ष होत नाहीत. दलाल देईल, त्या रकमेवर आंबा उत्पादकाला समाधान मानावे लागते, याकडे त्यानी लक्ष वेधले. अननस, पेरु, चिकु, केळी, कलिंगड, वगैरे फळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादक स्थानिक कृषी उत्पन्न बाजारात विक्रीसाठी आणू शकतील.
-
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59375 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..