कुडाळात कृषी प्रदर्शन मेळाव्यास दिमाखत सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात कृषी प्रदर्शन मेळाव्यास दिमाखत सुरुवात
कुडाळात कृषी प्रदर्शन मेळाव्यास दिमाखत सुरुवात

कुडाळात कृषी प्रदर्शन मेळाव्यास दिमाखत सुरुवात

sakal_logo
By

swt१८१२.jpg
L२२७०३
कुडाळः येथे शोभायात्रेचे उद्घाटन करताना आमदार वैभव नाईक, प्रजित नायर, राजेंद्र पराडकर, विजय चव्हाण आदी.

swt१८१३.jpg
L२२७०४
कुडाळः बैलगाडी सजावटमध्ये सहभागी शेतकरी.

swt१८१४.jpg
२२७०५
कुडाळः शोभायात्रेत विविध प्रकारचे लक्षवेधी देखावे सादर करण्यात आले.

swt१८१५.jpg
२२७०६
कुडाळः कृषी प्रदर्शनात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक सहभाग घेतला.

swt१८१६.jpg
L22707
कुडाळः विविध प्रकारच्या संकरित गाई कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरल्या.


कृषी प्रदर्शन मेळाव्यास दिमाखात सुरुवात
कुडाळात लक्षवेधी शोभायात्राः १९७ विविध इव्हेंट, डोळ्यांचे पारणे फेडणारे उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः येथील पंचायत समितीचा आज सकाळी न भूतो न भविष्यती असा दिमाखदार चित्ररथ, शोभा यात्रा सोहळा, सिंधू कृषि पशु पक्षी प्रदर्शन व पर्यटनमेळा सिंधूसरसमध्ये लक्षवेधी ठरला. विविध सजावट केलेल्या बैलगाड्या, विविधांगी नृत्याविष्कार, ढोल-ताशांचा गजर, लक्षवेधी चित्ररथ, लक्षणीय वेशभूषा, विविध भव्य देखावे असे विविध १९७ इव्हेंट यामध्ये सादर करण्यात आले.
जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने २० मेपर्यंत नवीन डेपोच्या भव्य मैदानावर सहाव्या सिंधू कृषि पशु पक्षी प्रदर्शन व पर्यटनमेळा सिंधूसरस मेळावा होत आहे. शोभायात्रेचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विद्यानंद देसाई, कृषि विकास अधिकारी सुधिर चव्हाण, तहसीलदार अमोल फाटक, पोलीस निरीक्षक प्रेमचंद मेंगडे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण उपस्थित होते.
गटविकास अधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पंचायत समितीचे अधिकारी सर्व विभागाचे कर्मचारी वर्ग शोभायात्रेत विविधांगी वेशभूषेत लक्षवेधी चित्ररथांसह सहभागी झाले होते. कुडाळ पंचायत समितीच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या शोभायात्रेमध्ये विविध प्रकारचे ९७ इव्हेन्ट सहभागी झाले. पशुसंवर्धन विभागाच्या ३५ बैलगाड्या, २४ प्रकारचे प्रदर्शनीय वळू, घोडी, बदके, ससे, कोंबडी, कबुतरे, प्रदर्शनीय शेळ्या-बोकड, वेगवेगळ्या जातींचे प्रदर्शनीय कुत्रे, चलचित्र रथ सहभागी झाले. याबरोबरच कुडाळ पंचायत समितीच्या अंगणवाडी सेविकांचा पोषण पालखी चित्ररथ, महिलांचा नऊवारी वेशभूषेतील पोषण टोपल्या चित्ररथ, लेझीम पथक व मोटारसायकल रॅलीचा सहभाग होता. कुडाळच्या शिक्षक कर्मचारी यांचा विविध दशावतार पात्रांनी युक्त असा चित्ररथ व एकसुत्री वेशभूषेतील मोटारसायकल रॅलीसुद्धा सहभागी झाली. बचतगट महिलांचा पोषण परसबाग चित्ररथ, १०० महिलांचा सहभाग असलेली, प्रांतवार वेशभूषा असलेला व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी रॅली तसेच दणकेबाज महिलांचे ढोलपथकयांनी अधिक रंगत आली.
आरोग्य विभागातील ४० कर्मचाऱ्यांची पारंपरिक शेतकरी वेशभूषेतील मोटरसायकल रॅली व शेतकरी वेशभूषेतील चित्ररथ सहभागी होणार आहे. कृषि विभागाकडील गावठी बाजार, कृषि यांत्रिकीकरण चित्ररथ तसेच कोंबडा, आंबा, मोर, हत्ती, पोपट ही चलचित्रे सहभागी असतील. ग्रामसेवक बांधवांची विठ्ठलाची वारकरी दिंडी, नेरूर मांड उत्सवातील चलचित्र, नऊवारी साडीतील महिलांचे ढोलपथक सहभागी झाले होते. अशा या भव्यदिव्य शोभायात्रेत सुमारे १००० शेतकरी, पशुपालक, अधिकारी, कर्मचारी व अंदाजे १५० विविध प्रकारची जनावरे सहभागी झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59381 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top