rat1820.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rat1820.txt
rat1820.txt

rat1820.txt

sakal_logo
By

प्रवासात महिलेचे बॅगसह दागिने पळवले
रत्नागिरी ः रेल्वच्या मेंगलोर एक्स्प्रेसमधून प्रवासात महिलेच्या बॅगसह १८ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने पळवणाऱ्या चोरट्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ मार्चला भोके ते रत्नागिरी येथे रेल्वेप्रवासात भरदिवसा घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गीता गणेश निवलेकर (वय ५२, रा. कांजुरमार्ग पुर्व-मुंबई, सध्या बौद्धवाडी बावनदी, रत्नागिरी) या रेल्वेने प्रवास करत असताना बॅग सीटवर ठेवली होती. या बॅगेत १८ हजाराची कर्णफुले व ८०० रुपये मुद्देमाल होता. चोरट्याने तो पळवला. या प्रकरणी गीता निवलेकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार वाजे करत आहेत.
--------