चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासामुळे कोकण रेल्वे फुल्ल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासामुळे कोकण रेल्वे फुल्ल
चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासामुळे कोकण रेल्वे फुल्ल

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासामुळे कोकण रेल्वे फुल्ल

sakal_logo
By

फोटो rat18p14.jpg
22656
खेड ः खेड रेल्वेस्थानकात प्रवाशांची झालेली गर्दी. (सिद्धेश परशेट्ये ः सकाळ छायाचित्रसेवा)
...
चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासामुळे कोकण रेल्वे फुल्ल

खेड रेल्वेस्थानकात गर्दी; प्रतीक्षायादी वाढती, वेळापत्रक विस्कळीत
खेड, ता. १८ ः उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असल्याने मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात आपल्या मूळगावी दाखल झाले आहेत. तर काही चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासाची वाट धरली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. महिनाभर बहुतांशी रेल्वेगाड्यांचे तिकीट बुकिंग फुल्ल झाले असून, बहुतांशी गाड्यांची तिकिटे सरासरी साडेतीनशे ते चारशेच्या आसपास प्रतीक्षेत आहेत तर काही गाड्यांची वेटिंगलिस्टही फुल्ल झाल्याने बुकिंग बंद करण्यात आले आहे.
सध्या रेल्वेस्थानकावरील तिकीट केंद्रावर प्रवाशांची तिकिटांसाठी मोठी गर्दी होत असून, तिकीट केंद्रासमोर तासनतास प्रवाशांना वेटिंग करावे लागत आहे. कोरोना काळानंतर कोकण रेल्वे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा देत आहे. सध्या शाळा, कॉलेजना सुट्टी असल्याने मुंबईकर चाकरमानी आपल्या कुटुंबासह गावी दाखल होत आहेत. मे महिन्यात गावी लग्नसमारंभ तसेच धार्मिक कार्यक्रम उरकून मुंबईकर चाकरमान्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला आहे.
खासगी आराम बस, अन्य खासगी वाहनांनी गावी येणाऱ्‍यांपेक्षा कोकण रेल्वेने येणाऱ्‍या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वच रेल्वेगाड्या सध्या हाऊसफुल्ल धावत आहेत. बहुतांशी रेल्वेगाड्यांचे तिकीट एक-दोन महिने आधीच बुकिंग केली आहेत तर बरेजजण एक दिवस आधी तत्काळ तिकिटे काढून गावी दाखल होत आहेत. वेटिंग तिकिटांसाठीही मोठी रांग आहे. मुंबईहून येणाऱ्‍या व जाणाऱ्या बहुतांशी रेल्वेगाड्यांच्या तिकीटांची प्रतीक्षायादी वाढत आहे. सरासरी साडेतीनशे ते चारशेच्या जवळपास वेटिंग आहे. एप्रिल महिन्यात गावी आलेले चाकरमानी मुंबईला परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे त्यांचीही तिकिटांसाठी गर्दी होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच रेल्वेस्थानकावर सध्या चाकरमानी व प्रवाशांची गर्दी होत आहे.
...
चौकट :
कोकणकन्याच्या इंजिनमध्ये बिघाड
कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे बिघडलेल्या वेळापत्रकाची परिस्थिती सोमवारी-मंगळवारीदेखील कायम राहिल्याने प्रवाशांना मनःस्तापाला सामोरे जावे लागले. मांडवीसह कोकणकन्या एक्सप्रेस गेले दोन दिवस तीन तास विलंबाने धावली. एकीकडे रखडपट्टीचा प्रवास, दुसरीकडे तुफान गर्दीमुळे सुट्टीच्या हंगामात प्रवाशांचे हाल होत आहेत. कोकण मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये विलवडेनजीक रविवारी झालेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. अद्यापही कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत आहे.
--------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59412 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top