
अरुणा कटारा यांना एक्सलन्स पुरस्कार प्रदान एज्युकेशन पुरस्कार प्रदानएज्युकेशन पुरस्कार प्रदान पुरस्कार प्रदान
rat18p17.jpg
L22658
- अरुणा कटारा
..........
अरुणा कटारा यांना एक्सलन्स
एज्युकेशन पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः होप फाउंडेशन, फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा यांना एक्सलन्स इन प्रमोटिंग एज्युकेशन फॉर सोशल कॉज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पर्यटन आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान आला.
असोचॅम नॅशनल कौन्सिल ऑन एज्युकेशन या संस्थेमार्फत हा सोहळा १५ व्या असोचॅम इंटरनॅशनल एज्युकेशन लिडरशिप अँड स्किल डेव्हलपमेंट समिट २०२२ या कार्यक्रमात नवी दिल्लीच्या हॉटेल शांग्री-ला येथे झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या. फिनोलेक्स समूहाचे अध्यक्ष (कै.) पी. पी. छाब्रिया यांनी १९९६ साली फिनोलेक्स अॅकॅडमीची स्थापना केली. कोकणातील गरजू विद्यार्थ्यांना किफायतशीर दरात दर्जेदार शिक्षण देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कटारा या फिनोलेक्स समूहाचे अध्यक्ष (कै.) छाब्रिया यांचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फिनोलेक्स अॅकॅडमी नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील असते. या महाविद्यालयातून आत्तापर्यंत जवळपास ७५०० विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. फिनोलेक्स अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59413 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..