रत्नागिरी ः सृजन दी क्रीएशन संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः  सृजन दी क्रीएशन संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात
रत्नागिरी ः सृजन दी क्रीएशन संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात

रत्नागिरी ः सृजन दी क्रीएशन संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात

sakal_logo
By

फोटो काल सोडला
...
rat18p1.jpg
22614
ः रत्नागिरी ः सृजन दी क्रीएशन या संस्थेच्या वर्धापनदिनात उपस्थित विद्यार्थी व संस्था पदाधिकारी.
----
दहा एकांकिकांनी रसिकांना दिला सृजनानंद

सृजन दी क्रीएशनचा वर्धापन दिनाला परदेशातील कलाकारही सहभागी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ः जिल्ह्यातील मुलांना मनोरंजन, लेखन, नाट्य या क्षेत्रात व्यासपीठ उलब्ध व्हावे, यासाठी ऑनलाइन एकांकिका स्पर्धा, लेखन असे योगदान देणाऱ्या यळवंड (ता. राजापूर) येथील अध्यक्ष राजेश देशपांडे यांच्या सृजन दी क्रीएशन संस्थेचा वर्धापनदिन मुंबईत प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृहात उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात दहा दर्जेदार एकांकिका सादर झाल्या.
या संस्थेला शुक्रवारी (ता. ६) मे रोजी दोन वर्षे पूर्ण झाली असून, फक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातील कलाकारांनी या वर्धापन दिनात सहभाग घेतला होता. या वेळी सृजन परिवारातील सदस्या खालिदा शेख यांच्या आकर्षण या दीर्घकथेचं प्रकाशन प्रमुख पाहुणे अभिषेक घोसाळकर यांच्या हस्ते झालं तर सृजनाक्षर या डिजिटल अंकाचे प्रकाशनही झाल्याचे सृजन दी क्रीएशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश देशपांडे यांनी सांगितले. या वेळी समीर सामंत, संभाजी सावंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात स्मिता पोतनीस, सुरुची विरकर यांनी निवेदन सादर केले. खालिदा शेख यांच्याबद्दल प्रीती देसाई यांनी त्यांच्या लेखनाचा प्रवासाची सुरवात कशी झाली, हे सांगितले.
कार्यक्रमात दहा दर्जेदार एकांकिका सादर झाल्या. लहान मुलांनीही भाग घेतला होता. डॉ. स्मिता दातार, स्मिता पोतनीस, राजेश देशपांडे, आशिष पाथरे लिखित एकांकिकांनी रसिकांची मने जिंकली. लॉकडाउन काळात ऑनलाइन कार्यशाळा घेऊन राजेश देशपांडे यांनी जणू विडाच उचलला होता, एकांकिका सादरीकरणाचा. सर्व कलाकारांनीही कसून मेहनत केली होती.
...
चौकट
एक मोठा परिवार..
सृजन दी क्रीएशन हा एक मोठा परिवार बनला असून, ''एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ जणू'' हे या परिवाराचे ब्रीदवाक्य आहे. दरवर्षी असेच वर्धापनदिन साजरे होतील, अशी आशा सर्वांनी व्यक्त केली. राजेश देशपांडे, स्मृती देशपांडे आणि सृजन देशपांडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
-----

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59433 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top