सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द
सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द

सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द

sakal_logo
By

22743
कुडाळ ः येथे बुधवारी सिंधुसरसचे उद्‌घाटन करताना विनायक राऊत, वैभव नाईक, दीपक केसरकर, के. मंजुलक्ष्मी, प्रजित नायर, राजेंद्र पराडकर, विजय चव्हाण, संदेश पारकर, सतीश सावंत आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)


सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
विनायक राऊत; ‘सिंधुसरस’ मेळाव्याचे दिमाखात उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आज विविध प्रकल्पांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा वैभवशाली बनत आहे. जिल्हा परिषदेचा कृषी प्रदर्शन भव्य मेळावा ही विकासाची नांदी आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून पुढे कसा वाटचाल करेल, यासाठी कार्यरत राहू, असे प्रतिपादन शिवसेना लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले.
कृषी व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषदेतर्फे आयोजित सिंधू कृषी औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन व पर्यटन मेळाव्यास मंगळवारपासून (ता. १७) कुडाळ एस. टी. डेपोच्या मैदानावर प्रारंभ झाला. त्याचे उद्‍घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, ‘‘सिंधुसरस शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी वरदान ठरणारे आहे. जिल्हा सर्व क्षेत्रांत विकासाकडे झेपावत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून विकासाची गंगा सिंधुदुर्गात वाहत आहे.’’
आमदार वैभव नाईक म्हणाले, ‘‘कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गचा विकास कसा होईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सिंधुसरस प्रदर्शन ही त्याची नांदी आहे. या सरसमधून शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल करावा.’’ माजी पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, ‘‘सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास, तसेच शेतीला चालना देण्यासाठी आमचे नेहमीच सहकार्य राहील.’’ जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘सिंधुसरसची शोभायात्रा आकर्षण ठरेल.’’ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रास्ताविकात सिंधुसरसच्या माध्यमातून कृषी, मासेमारी, शेती यातून लोकांचे उत्पन्न वाढवणारी कामे या प्रदर्शनामध्ये आहेत. त्याचा या ठिकाणच्या शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, असे सांगितले.
व्यासपीठावर पर्यटन मंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी नायर, घाटकोपरचे नगरसेवक सुरेश पाटील, नगराध्यक्ष आफरीन करोल, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा अधीक्षक म्हेत्रे, जिल्हा कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, पशुसंवर्धन अधिकारी विद्यानंद देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, वर्षा कुडाळकर, अनुप्रिती खोचरे, जयभारत पालव, श्रेया परब, मथुरा राऊळ, मिलिंद नाईक, सचिन कदम आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी चव्हाण यांनी स्वागत केले. प्रफुल्ल वालावलकर यांनी आभार मानले.

शोभायात्रेचे कौतुक
सिंधुसरसमध्ये पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून मोठी शोभायात्रा काढण्यात आली. त्याचे अनेकांनी कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59436 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top