रत्नागिरी- जखमी बांधकाम कामगाराला संघटनेचे अर्थसाह्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- जखमी बांधकाम कामगाराला संघटनेचे अर्थसाह्य
रत्नागिरी- जखमी बांधकाम कामगाराला संघटनेचे अर्थसाह्य

रत्नागिरी- जखमी बांधकाम कामगाराला संघटनेचे अर्थसाह्य

sakal_logo
By

विधायकः लोगो
...
rat18p24.jpg
22720
रत्नागिरी ः जखमी बांधकाम कामगाराला मदत देताना संघटनेचे अध्यक्ष महादेव कोरे, उपाध्यक्ष नारायण खोराटे, सचिव सुयोग वांदरकर आदी.
...
जखमी बांधकाम कामगाराला संघटनेचे अर्थसाह्य

रत्नागिरी, ता. १८ ः बांधकाम करताना पायात सळई घुसल्याने सिद्रामय्या शिवय्या मठ (रा. रवींद्रनगर, कुवारबाव, रत्नागिरी) हा कामगार जखमी झाला होता. त्याला अलीकडेच स्थापन झालेल्या बांधकाम कामगार सहाय्यक संघाने तातडीने अर्थसाह्य केले.
सिद्रामय्या एका इमारतीच्या बांधकामात काम करत असताना त्याच्या पायात लोखंडी सळई घुसली. मोठी दुखापत झाली. त्याला तातडीने दवाखान्यात हलवून उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच बांधकाम कामगार सहाय्यक संघाचे अध्यक्ष महादेव कोरे, उपाध्यक्ष नारायण खोराटे, सचिव सुयोग वांदरकर, उपसचिव अशोक खेत्री, सदस्य निलकंठ ककेरकर आणि चंद्रकांत बेकवाडकर यांनी तातडीने सिद्रामय्याची भेट घेऊन त्याला आर्थिक साहाय्य केले.
या संघटनेची स्थापना गेल्या मार्चमध्ये झाली. संघटनेचे कार्यालय कारवांचीवाडी येथील माऊली अपार्टमेंटमध्ये गाळा क्र. ६ येथे आहे. तेथेही संपर्क साधता येईल, असे सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांना सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, आर्थिक योजना आणि शासकीय योजना उपलब्ध करून देण्याकरिता कार्य करत आहे.
....
चौकट
सभासदत्व घेऊन नोंदणी करा
बांधकाम कामगारांना कोणतीही सुरक्षा नसते. त्यांना आर्थिक तसेच वैद्यकीय मदत करण्याचे काम बांधकाम कामगार सहाय्यक संघ करत आहे. त्याकरिता बांधकाम कामगारांनी बांधकाम कामगार सहाय्यक संघाचे सभासदत्व घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष महादेव कोरे, उपाध्यक्ष नारायण खोराटे, सचिव सुयोग वांदरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59440 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top