रत्नागिरी ः रत्न कृषी महोत्सवाचे आज उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः रत्न कृषी महोत्सवाचे आज उद्घाटन
रत्नागिरी ः रत्न कृषी महोत्सवाचे आज उद्घाटन

रत्नागिरी ः रत्न कृषी महोत्सवाचे आज उद्घाटन

sakal_logo
By

रत्न कृषी महोत्सवाचे आज उदघाटन

पशूपक्षी प्रदर्शन ठरणार खास वैशिष्ट्य; विविध कार्यक्रम
रत्नागिरी, ता. १८ ः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद पशू विभाग आणि जिल्हा नियोजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्न कृषी महोत्सव आणि पशूपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (ता. १९) सकाळी ११ वा. होणार आहे. या वेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडांगणावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात १२० स्टॉल लावण्यात आले असून, त्यातील २५ स्टॉल हे हापूस आंबा बागायतदारांसाठी आहेत. उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी ३ वा. कृषी पर्यटन या विषयावर मकरंद केसरकर यांचे मार्गदर्शन आहे. सायं. ४. ३० वा. कोकणातील शेती व शेतीसंलग्न व्यवसाय यावर सुहास पंडित यांचे मार्गदर्शन, सायं. ७ वा. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असून त्यात गायक स्वप्नील बांदोडकर, हास्यजत्रा फेम अंशुमन विचारे, कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम कमलाकर सातपुते, अभिनेत्री तेजा देवकर, सूर नवा ध्यास नवामधील ईशानी पाटणकर सहभागी होणार आहेत. २० मे रोजी सकाळी ११ वा. पणनचे सरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांचे दुपारी १२.३० वा. भात व नाचणी उत्पादन तंत्रज्ञान विषयावर डॉ. विजय दळवींचे मार्गदर्शन आहे. दुपारी ३ वा. मत्स्यप्रक्रिया आणि मुल्यवर्धन या विषयावर मत्स्य महाविद्यालयाकडून मार्गदर्शन केले जाईल. सायंकाळी उशिरा महाराष्ट्रातील विविध लोककला आणि कोकणातील लोककलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. २१ मे रोजी सकाळी११ वा. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची माहिती देणारे मार्गदर्शन जिल्हा संसाधन व्यक्ती शेखर विचारे, जिल्हा अग्रणी बँके व्यवस्थापक एन. डी. पाटील हे करणार आहेत. दुपारी ३ वा. समारोप कार्यक्रम होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59443 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top