
वाढावा
फोटो आयपीवर देत आहे
..
कामथे घाटात चारचाकी वाहनाला रिक्षाची धडक बसल्यानंतर चार चाकी अशी पलटी झाली.
....
कामथे घाटात कार व रिक्षा
अपघातात सातजण जखमी
चिपळूण, १८ : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात कोंडमळा गावच्या हद्दीत भरधाव कारची रिक्षाला समोरुन धडक लागल्याने अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनातील सातजण जखमी झाले असून त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान घडला. महामार्गावर रत्नागिरीहून येणाऱ्या रिक्षाला समोरासमोर जोरदार धडक बसली. कार चालक चंद्रकांत भोजने व डॉ. सिद्धार्थ कांबळे (६३), सौ. स्मिता कांबळे (५७),आर्या कांबळे (१८, सर्व रा. ठाकुर्ली) हे चारहीजण जखमी झाले. तर रिक्षा चालक किरण मोहिते (३८), सौ.कशिश मोहिते (३५, दोघेही रा.कान्हे), अश्विनी गमरे (रा.हेदली) हे जखमी झाले. रिक्षात चालकासह चारजण होते. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली. परंतु सावर्डे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरु केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59511 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..