काही अपघात टाळता येण्याजोगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काही अपघात टाळता येण्याजोगे
काही अपघात टाळता येण्याजोगे

काही अपघात टाळता येण्याजोगे

sakal_logo
By

आरोग्य सदर

swt191.jpg
22846
सुनील आठवले

अपघात टाळा
अपघातामुळे आपल्याबरोबरच समोरच्याचेही जीवनमान उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. यासाठी सर्वच पातळीवर सावधगिरी बाळगली गेली पाहिजे. काही अपघात टाळता येण्याजोगे असतात. अशावेळी घाई आणि अतिआत्मविश्‍वास यांना आळा घालता आला पाहिजे.
- डॉ. सुनील आठवले, देवगड

अपघात ठरवून होत नाही. म्हणूनच त्याला ''अपघात'' म्हणतात. अचानक झालेल्या कुठल्याही घटनेतून शरीराला इजा होणारी कृती म्हणजे अपघात. मग पाण्यात बुडणे असो, उंचावरून पडणे असो, भाजणे असो किंवा अन्य घटना असो, हे अपघाताचे वेगवेगळे प्रकार असतात. साधारण सत्तर टक्के अपघात हे आपण ओढवून आणलेले असतात. त्यामुळे काही अपघात नसतात. दुसरी गोष्ट अशी आहे की, काही अपघात आपण टाळण्याजोगे असतात; पण आपण टाळत नाही. प्रत्येक माणसाला थोडी फार मस्ती असते किंवा अतिआत्मविश्‍वास असतो. स्वतःबद्दल ज्यादा आत्मविश्वास असतो. त्यामुळे अपघात घडतात. चुकून अपघात घडला, तर त्याला इलाज नसतो. घाटातून प्रवास करताना अचानक कडा कोसळल्यास त्या गोष्टीला इलाज नसतो; परंतु चुकीची गाडी चालवली आणि अपघात झाला, तर नक्कीच क्षम्य नाही. नाही तर त्याची किंमत खूप मोठी असते. मुख्य म्हणजे एखाद्या अपघातात कोणाचा तरी हकनाक बळी जातो. तर एखादा घरी लोळत पडलेला असतो. तो स्वतःचे आयुष्य तर बरबाद करतोच; परंतु सर्व घरच्यांचे आयुष्य बदलून टाकतो. यातून आर्थिक, सामाजिक, शारीरिक सगळी गणिते बदलून जातात. त्यामुळे कोणतीही गोष्ट सावधगिरीने नीट करणे हे योग्य ठरते. सावधगिरी बाळगायची म्हणजे काय? हे शालेय जीवनातच बरेचदा शिकवले जाते; परंतु त्याचे पालन होत नाही. कारण आपल्यामध्ये नको इतका आत्मविश्वास असतो. विशेषतः आपली आर्थिक स्थिती सुधारली म्हणजे आपले हात उंचावर पोचले, अशी कित्येकांची समजूत असते आणि यातूनच अनेक अपघातांना आमंत्रण दिले जाते. अतिविश्वास हा अनेकदा घातक ठरतो. आग, पाणी, उंच जागा, अवजड वस्तू या सर्वांपासून सावध राहणे आवश्यक असते. साधा पंक्चर झालेला टायर बदलणे हा देखील अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. कोणत्या गोष्टीमुळे कसा अपघात घडेल, हे सांगता येत नाही. डोक्यात नारळ पडून एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. हा अपघात दुर्दैवी आहे; परंतु वीज चमकत असताना झाडाखाली उभे राहणे आणि मग वीज कोसळल्याने मृत्यू झाल्यानंतर हळहळणे यात काही उपयोग नसतो. म्हणून अपघात होण्याआधीच काळजी घेणे हे अतिशय महत्त्वाचे असते. अपघात झाल्यानंतर त्याला मदत करणे हेही तितकेच आवश्यक आहे. लोक अपघाती मृत्यू झाला किंवा एखादा जखमी झाला, तर लांब पळतात. पोलिसांची कटकट नको, असे त्यांना वाटते. तर काहीवेळा पोलिसांची कटकट नसून तो तपास असतो. आपण पोलिसांना सहकार्य केले तर पोलिस आपल्याला सहकार्य करतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कोणत्याही रुग्णाला, अपघाती व्यक्तीला ताबडतोब मदत देणे हे मानवी कर्तव्य आहे आणि कर्तव्य भावनेतून आपण रस्त्याने फिरताना ही सावधगिरी आणि मदत देऊ केली पाहिजे, हे महत्त्वाचे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59581 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top