
''मुंबई-गोवा महामार्गाला बाळशास्त्रींचे नाव द्या''
swt192.jpg
22847
देवगडः नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांना पत्रकारांनी निवेदन दिले.
‘महामार्गाला बाळशास्त्रींचे नाव द्या’
देवगडः मुंबई-गोवा महामार्गाला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याची मागणी येथील तालुका पत्रकार समितीच्यावतीने करण्यात आली. आपल्या मागणीचे निवेदन येथील तहसीलदारांना देण्यात आले. नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी निवेदन स्विकारले. मुंबई - गोवा महामार्गाला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याची जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी आहे. या अनुषंगाने येथील तालुका पत्रकार समितीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, माजी तालुकाध्यक्ष संतोष कुळकर्णी, राजेंद्र मुंबरकर, प्रशांत वाडेकर, गणेश आचरेकर, सूरज कोयंडे, मोहन पडवळ आदी उपस्थित होते.