
जलसंधारण बंधाऱ्यांना १४५ कोटी मंजूर
22887ः संग्रहीत
...
जलसंधारण बंधाऱ्यांना १४५ कोटी मंजूर
आमदार कदम यांची माहिती; दापोली मतदारसंघात तीन प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ ः दापोली मतदार संघातील खेड, दापोली व मंडणगड या तीन तालुक्यासाठी प्रस्तावित १४ जलसंधारण प्रकल्पापैकी १४५ कोटी रुपयांच्या तीन प्रकल्पांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
खेड तालुक्यातील भरणे येथे जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या वेळी आमदार कदम म्हणाले, कोकणातील सिंचनाचा टक्का वाढवण्यासाठी मी आमदार झाल्यापासून माझ्या मतदार संघात प्रयत्नशील आहे. गेल्या तीन वर्षांपासून माझ्या मतदार संघातील खेड, दापोली व मंडणगड या तिन्ही तालुक्यात जलसंधारण विभागातून बंधारे मंजूर करून घेण्यासाठी १४ प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवले आहेत. काही महिन्यांपूर्वी खेडमधील शिवतर येथील कोडबा बंधारा मंजूर होऊन त्याचे काम सुरू झाले आहे. उर्वरित १३ पैकी आणखी तीन प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यामध्ये ४३ कोटी रुपयांचा दापोली तालुक्यातील भडवळे प्रकल्प, ४३ कोटी रुपयांचा पालगड मळेकरवाडी प्रकल्प व ५७ कोटी रुपयांच्या खेड तालुक्यातील आंबवली येथील प्रकल्पाचा समावेश आहे. हे प्रकल्प मंजूर करून घेण्याची प्रेरणा शिवसेना नेते रामदास कदम असून या वेळी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणाला झुकते माप दिले आहे.
..
चौकट
अऩ्य प्रकल्पदेखील लवकरच मंजूर
चालू प्रकल्पांना निधी देतानाच नवीन प्रकल्पाना मंजुरी व निधी देण्यात येत असल्याने आम्ही मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभारी आहोत. दापोली मतदार संघातील खेड तालुक्यातील वडगाव, मंडणगडमधील कादवन, नारगोली, दापोली तालुक्यातील करंजाडी, कुडावळे प्रकल्पदेखील लवकरच मंजूर होतील, असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी या वेळी व्यक्त केला.
..
ग्राफ करावा
एक नजर..
दापोली तालुक्यातील भडवळे प्रकल्पः ४३ कोटी रुपये
पालगड मळेकरवाडी प्रकल्पः ४३ कोटी रुपये
आंबवली येथील प्रकल्पः ५७ कोटी रुपये