
टु १
नायरी-धनगरवाडी रस्ते कामाचे भूमिपूजन
संगमेश्वर ः तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या नायरी माच धनगरवाडी रस्ताकामाचे भूमिपूजन शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या हस्ते झाले. या भागात रस्ता व्हावा यासाठी राजेंद्र महाडिक आणि जिल्हा परिषद सदस्य रचना महाडिक यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार २ कि.मी. रस्त्याचे काम मंजूर झाले. भूमिपूजनाला माजी सभापती सुजित महाडिक, नायरी माच धनगरवाडीचे ग्रामस्थ रामचंद्र झोरे, सुनील झोरे, शांताराम झोरे, पांडुरंग झोरे, लक्ष्मण झोरे, गंगाराम झोरे, बाब्या झोरे यांच्यासह नायरी सरपंच चाळके आदी उपस्थित होते.
----------
देवरूखमध्ये एसटीची पार्सल सेवा बंद
देवरूख ः देवरूख एसटी आगारातील पार्सलसेवा गेले तीन महिने बंद आहे. संपकाळात बंद झालेली पार्सलसेवा अजूनही सुरू न झाल्याने व्यापारीवर्ग व नागरिक त्रस्त झाले आहेत. मे महिना हा आंबा सिझन असताना आंबापेटी पाठवायला नागरिकांना जादा रक्कम मोजून खासगी कंपन्यांकडे जावे लागत आहे. महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून पार्सलसेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता एसटी सेवा सुरळीत झालेली आहे. याचा नागरिकांना फायदा होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59612 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..