
खेड ः तिसंगीतील एका बांबूच्या बेटाला आली फुले
दोन्ही फोटोंना एकच कॅप्शन आहे
...
-rat19p12.jpg,
22907
...
rat19p13.jpg
L22908
ःखेड ः तालुक्यातील तिसंगी येथे फुले आलेले बांबूचे बेट. (छायाचित्र ः डॉ. विनया जंगले, खेड)
-----------
तिसंगीतील एकाच बांबूच्या बेटाला फुले
अभ्यासकांना चिंता; पर्यावरणीय बदलातील एक मोठं स्थित्यंतरं
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ ः बांबू म्हटले की, आकाशाला टेकू देत उंच उभी असलेले बेट डोळ्यासमोर येतं. या बांबूला आलेला मोहोर अपवादाने पाहायला मिळतो. खेड तालुक्यातील तिसंगी परिसरात बांबूच्या बेटाला आलेली फुलं निसर्ग अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या घटनेकडे निसर्गप्रेमी व अभ्यासक मात्र वेगळ्या नजरेने पाहतात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बांबूच्या काही प्रजातीमध्ये पाच ते दहा तर काही प्रजातीमध्ये तब्बल चाळीस ते पन्नास वर्षांनी फुले येतात. पाहणाऱ्यांसाठी तो देखणा दिसत असला तरी बांबू मोहरणं म्हणजे त्याच्या जीवनचक्रासह पर्यावरणीय बदलातील एक मोठं स्थित्यंतरं असत.
निसर्ग आपल्या अवतीभवती अनेक बदल घडवत असतो. सर्वात गतीने होणारे बदल आपल्या आसपास असलेल्या वनस्पतीमध्ये दिसून येतात. बांबू ही आपल्या आसपास आढळणाऱ्या गवताच्या प्रजातीमधील सर्वात मोठी वनस्पती आहे. बांबूच्या अनेक प्रजाती आपल्या आसपास आहेत. बांबूचे अनेक उपयोग मानवाने केले आहेत. आधुनिक बांधकाम साहित्याचा शोध लागण्यापूर्वी बांबू हाच मानवासाठी शेतकरी कुटुंबात लोकप्रिय व महत्वाची वनस्पती होता. बांबूच्या बेटाचा जेवढ्या पद्धतीने वापर शेतकऱ्यांनी केला आहे, तेवढा अन्य कोणत्याही वनस्पतीचा वापर झालेला दिसत नाही; परंतु बांबूचे जेवढे उपयोग आहेत, तेवढेच जीवनचक्रदेखील आश्चर्यजनक आहे. बांबूच्या बेटाला फुलं आल्यानंतर त्या बेटाचा मृत्यू होतो; परंतु मरण्यापूर्वी हे बेट हजारो बिया तयार करून नवीन बांबू बेटांना जन्म देण्याची तयारी करत असतात.
बांबूच्या बेटात फुलोरा आल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे त्याचे बी हे उंदिर व अन्य तत्सम प्राण्यांचा आहार असल्याने त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन निसर्गातील अन्नसाखळीवर त्याचा विपरित परिणाम होत असतो. उंदीर शेतातदेखील नासधूस करतात. त्याच काळात बांबूचे बेट नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना वापरासाठी बांबू उपलब्ध होत नसल्यामुळे बांबूला मोहोर येणं हे शेतकऱ्यांसाठी पूर्वी चिंतेची बाब समजली जायची. बांबू मोहोरणं (बांबू ब्लॉसम) ही एक नैसर्गिक घटना आहे. ज्या ठिकाणी बांबू फुलतात आणि बांबूच्या बियांसह टांगतात, त्या बांबू प्रजाती चीन, म्यानमार आणि भारतात आढळतात.
--------------------
चौकट
बांबू बहरणे म्हणजे त्याचा मृत्यू
कोकणात आढळणारा बांबू हा माणगा (Dendeocalamus stocksii) किंवा मेस (Pseudoxytenanthera madhavii) या प्रजातीमधील आहे. खेडमध्ये तिसंगी येथे बांबूला आढळलेली फुले म्हणजे त्याचा जीवनकाळ त्याने पूर्ण केल्याचे लक्षण आहे. या बांबूला कदाचित बिया येणार नाहीत; पण बांबूचे हे बेट कदाचित मरेल. या जातीच्या बाबतीत काहीही गणित नाही. याला sporadic flowering म्हणतात. अधूनमधून कुठेना कुठे दरवर्षी या जातीला फुले येत असतात; पण बिया कधीच मिळत नाहीत; परंतु काही प्रजाती मात्र तीस ते चाळीस किंवा त्याहूनही अधिक वर्षांनी फुलतात, हे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती बांबूतज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक विनय कोलते यांनी दिली.
..
चौकट
फुलोरा आल्यानंतर त्यांचा होणारा मृत्यू..
बांबू अभ्यासकांच्या मते, अनेक बांबूच्या प्रजातीचे जीवनचक्र तीस ते पस्तीस वर्षेदेखील असू शकते. त्यामुळे निसर्गातील अनेक पक्षी, प्राणी यांच्या प्रजातींना ही बांबू बेटं आपला अधिवास वाटू लागतात. त्यामुळे अशा प्रकारच्या बांबू प्रजातींना फुलोरा आल्यानंतर त्यांचा होणारा मृत्यू पर्यावरणावर दीर्घकालीन परिणाम करू शकतो.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59640 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..