राजापूर ः खताची उपलब्धता कळणार ब्लॉगमधून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः  खताची उपलब्धता कळणार ब्लॉगमधून
राजापूर ः खताची उपलब्धता कळणार ब्लॉगमधून

राजापूर ः खताची उपलब्धता कळणार ब्लॉगमधून

sakal_logo
By

2L22937ः संग्रहीत
...
काही सुखद...................लोगो
......
ब्लॉगमधून समजणार खताची उपलब्धता

जिल्हानिहाय माहिती; वेळ, पैशाची होणार बचत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ ः तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये खतपुरवठा करणाऱ्‍या केंद्रामध्ये किती मेट्रिक टन खत उपलब्ध आहे, त्यामध्ये कोणत्या केंद्रावर कोणत्या प्रकारचे खत उपलब्ध आहे, याची माहिती adoratnagiri.blogspot.com या ब्लॉगच्या माध्यमातून शेतकऱ्‍यांना मिळणार आहे. कृषी विभागातर्फे जिल्हानिहाय हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे.
शेतामध्ये लागवड केलेल्या पिकासह शेतातील अन्य नोंदीच्या नोंदी यापूर्वी तलाठी व मंडल अधिकार्‍यांमार्फत केल्या जात होत्या; मात्र, सध्याच्या डिजिटल युगामध्ये त्यामध्ये बदल होताना पिकपेरणीच्या या नोंदी आता शेतकरी स्वतःच्या अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलवरून विकसित केलेल्या अ‍ॅपद्वारे करत आहेत. त्याद्वारे डिजिटल युगामध्ये ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे शेतकरी हायटेक होऊ लागला आहे. त्यामध्ये खताच्या उपलब्धततेची माहिती देणाऱ्‍या ब्लॉगची भर पडली आहे. खताच्या विक्रीमध्ये पारदर्शकता यावी, म्हणून पॉस मशीनचा वापर केला जात असताना आता ब्लॉगच्या माध्यमातून शेतकऱ्‍यांना खताची उपलब्धतता कळणार आहे.
तालुका खरेदी-विक्री संघाच्या विक्री केंद्रासह पंचक्रोशीमध्ये कार्यरत असलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्‍यांना विविध प्रकारचे खत उपलब्ध होते; मात्र, अनेकवेळा सुमारे पंधरा ते वीस कि.मी. अंतर कापून खतविक्री केंद्राच्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्यक्षात खत उपलब्ध नसल्याची बाब शेतकऱ्‍याला समजते. त्यातून शेतकऱ्‍याला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्याचवेळी वेळाचाही अपव्यय होतो.
....
चौकट
खत खरेदीला जाण्यापूर्वी..
कोणत्या केंद्रावर कोणत्या प्रकारचे किती खत उपलब्ध आहे, याची माहिती देणारा ब्लॉग कृषी विभागातर्फे जिल्हानिहाय विकसित करण्यात आला आहे. या ब्लॉगवर जिल्ह्याचे नाव, त्यातील तालुक्याचे नाव, कृषिसेवा केंद्राचे नाव, खताची उपलब्धतता आदींबाबत सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे. ही माहिती इंटरनेटच्या माध्यमातून कुठूनही मोबाईलवरून ब्लॉग ओपन करून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांना आता कृषिसेवा केंद्र वा तालुका खरेदी-विक्री संघ वा विविध कार्यकारी सोयायटी येथे खत खरेदीला जाण्यापूर्वी या ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59641 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top