बुध्दपौर्णिमा उत्सव तुळस येथे उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुध्दपौर्णिमा उत्सव 
तुळस येथे उत्साहात
बुध्दपौर्णिमा उत्सव तुळस येथे उत्साहात

बुध्दपौर्णिमा उत्सव तुळस येथे उत्साहात

sakal_logo
By

L22943

तुळस ः बुध्द पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.

बुध्दपौर्णिमा उत्सव
तुळस येथे उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळ, तुळस यांच्या विद्यमाने तुळस येथे बुध्दपौर्णिमा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी बौद्धिक विचार मंथन, रांगोळी स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, होम मिनिस्टर आदी स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या.
कोकणचा आईनस्टाईन विजय दिनेश तुळसकर यांचा गायनाचा कार्यक्रम तसेच इंद्रधनू कलामंच (दाभोली) यांची एकांकिका आदी कार्यक्रम पार पडले. तर रस्सीखेच स्पर्धेचे उदघाटन सरपंच शंकर घारे, उपसरपंच सुशील परब, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. १५ मे रोजी महिलांसाठी ''होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा'' या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तुळस माजी सरपंच विजय रेडकर यांनी केले. सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.आभार साईराम तुळसकर यांनी मानले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त १६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी संजय पडते, विद्याधर परब,यशवंत परब, प्रा. व्ही. पी. नंदगिरीकर, बी. के. खर्डेकर, प्रा. सचिन परुळेकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लवू तुळसकर, राजन जाधव, शंकर तुळसकर, अनिल तुळसकर, शेखर तुळसकर, कृष्णा तुळसकर, विजय तुळसकर, श्याम तुळसकर, साईराम तुळसकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59644 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top