देवरूख ः राजकीय नेत्यांकडून मतदार संघात प्रचाराच्यादृष्टीने तयारी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ः राजकीय नेत्यांकडून मतदार संघात प्रचाराच्यादृष्टीने तयारी सुरू
देवरूख ः राजकीय नेत्यांकडून मतदार संघात प्रचाराच्यादृष्टीने तयारी सुरू

देवरूख ः राजकीय नेत्यांकडून मतदार संघात प्रचाराच्यादृष्टीने तयारी सुरू

sakal_logo
By

22955ः संग्रहीत
...
नेत्यांकडून मतदारसंघात साखरपेरणी

प्रचाराच्यादृष्टीने तयारी; नव्या प्रभागरचनेनुसारच निवडणूक
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १९ ः ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणाऱ्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मोकळा झाला आहे. नव्या गट-गण रचनेनुसार या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी गट व गणाचे मागील काही वर्षांचे आरक्षण गृहित धरून लोकांच्या भेटीगाठींवर भर देत साखरपेरणी सुरू केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांनी सारा ग्रामीण भाग ढवळून निघतो. अलीकडे तरुणांचाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे ओढा वाढला आहे. ग्रामीण भागातील नेतृत्व सिद्ध करण्याची जिल्हा परिषद व पंचायत समितींची निवडणूक हे एक साधन तरुणांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे निवडणुकीत आपल्याला संधी मिळाल्यास आपलाच पत्ता कसा ओपन होईल, यासाठी अनेकजण धडपडताना दिसत आहेत.
विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली आहे. त्यामुळे तेथील कारभार प्रशासकाकडून चालवला जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये नगर पालिकेतील समाविष्ट भाग वगळता ७ गट आणि १४ गण वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ६२ तर पंचायत समिती सदस्यांची संख्या १२४ होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात १० मार्च २०२२ रोजीच्या स्थितीनुसारच या निवडणुका घ्यावेत, असे म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नव्या प्रभागरचनेनुसारच होणार हे स्पष्ट झाले आहे.
..
चौकट
भेटीगाठीवरही इच्छुकांचा भर
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांनी आतापासूनच गट-गणांत संपर्क वाढवण्यास सुरवात केली आहे. गावोगावी विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटनांसह प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांसह इच्छुक उमेदवारांकडून कार्यवाही सुरू आहे. गावोगावी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटीगाठीवरही इच्छुकांनी भर दिला आहे.
---------------------------------------
चौकट
चित्र अद्यापही अस्पष्ट
कोणत्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये कोणते आरक्षण पडणार? याबाबतचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. असे असले तरीही मागील निवडणुकांवेळी संबंधित गटात कोणते आरक्षण होते, याचा विचार करून आगामी आरक्षणाचे आराखडे बांधून इच्छुक उमेदवारांची मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे गावोगावी मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरू झाली आहे.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59646 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top