
पा २ मस्ट
२ कॉलममध्ये घ्यावी
..
-rat19p27.jpg
L22939
ः रूपाली पाटील
........
गंधावल्या वृक्षसावल्याचे
प्रकाशन सोमवारी
खेड ः येथील रूपाली पाटील यांच्या गंधावल्या वृक्षसावल्या या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवी, प्रसिद्ध गीतकार अरुण म्हात्रे यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम २२ मे रोजी सकाळी ११. ३० ते १. ३० या वेळेत शहरातील द. ग. तटकरे सभागृहात पार पडणार आहे. गंधावल्या वृक्षसावल्या हा पाटील यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे. यापूर्वी विविध मासिके, वर्तमानपत्रे आणि साप्ताहिकामधून त्यांचे लिखाण वाचकांना वाचायला मिळाले आहे. त्यांचा हा कवितासंग्रह समग्र प्रकाशनाच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीला येत आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दै. सकाळचे निवासी संपादक निखिल पंडितराव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूरचे सचिव शिवराज नाईकवडे, महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समिती अध्यक्ष प्रशांत परांजपे, कोकण मराठी साहित्य परिषद, खेडचे तालुकाध्यक्ष विमलकुमार जैन, दापोली येथील कवी सुदेश मालवणकर, कथालेखक व कवी प्रा. पी. एस. पाटील उपस्थित राहणार आहेत.