टु १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टु १
टु १

टु १

sakal_logo
By

सायली दामले यांचे होणार कीर्तन
रत्नागिरी : श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस) आणि रत्नागिरीतील अध्यात्म मंदिर, अखिल भारतीय कीर्तनकुल आयोजित कीर्तन मालिकेत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयी सायली मुळ्ये- दामले कीर्तने करणार आहे. येत्या २१ व २२ मे रोजी सायंकाळी ५.३० ते ७.१५ या वेळेत वरच्या आळीतील अध्यात्म मंदिरात कीर्तन होणार आहेत. गर्जा जयजयकार क्रांतीचा या नावाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ऑक्टोबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत दरमहा कीर्तने सादर होत आहेत. यात सायली दामले हिचे कीर्तन आयोजित केले आहे. यामध्ये ती चंपावती व मैनावती आख्यान विषय रंगवणार आहे. सायली मुळ्ये या संगीत विशारद, कीर्तन विशारद आहेत. फडकेशास्त्री तसेच कीर्तनाकरिता नाना जोशी, कर्वे बुवा, महेशबुवा काणे, किरण जोशी, विशाखा भिडे आणि गायनाकरिता संध्या सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.