
रत्नागिरी ः शोभिवंत मत्स्यशेतीतील स्वयंरोजगार संधी - भाग 1
22984ः छोटा फोटो वापरा डोक्यामध्ये
...
आधुनिक मत्स्यपुराण ..........लोगो
......
rat19p32.jgp
22982
ः डॉ. संदेश पाटील.
.......
इंट्रो
शोभिवंत मत्स्यपालन हा मत्स्यसंवर्धनातील महत्त्वाचा घटक आहे. मर्यादित जलचर प्रणालीमध्ये राहणारे शोभिवंत मासेविक्री हा एक प्रमुख व्यवसाय आहे तसेच शोभिवंत मत्स्यपालन हा जगातील सर्वात मोठा जोपासला जाणारा छंद आहे व त्यामुळे मानवी जीवन तणावमुक्त होण्यास मदत होते. घराची शोभा वाढवण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी घरोघरी मत्स्यालय ठेवले जाते आणि जगभरातून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी शोभिवंत माशांचे संवर्धन क्षेत्र वाढत आहे. प्रजातींची समृद्ध विविधता आणि अनुकूल हवामान, स्वस्त कामगार आणि सहज वितरण यामुळे भारतामध्ये शोभिवंत मत्स्यपालनासाठी अनुकूल वातावरण आहे. शोभिवंत माश्यांची पैदास करून त्यांची योग्य वाढ करून मागणीनुसार विक्री करणे तसेच शोभिवंत मत्स्यपालनाशी संलग्न इतर व्यवसाय करणेदेखील कसे शक्य आहे, हे सांगणारा लेख.
-डॉ. संदेश पाटील, रत्नागिरी
------------------------------
शोभिवंत मत्स्यशेतीत स्वयंरोजगार संधी
माशांच्या प्रजाती आणि पैदास
आकर्षक, विविधरंगी, शरीराचा विशिष्ट आकार, पोहण्याचे वर्तन आणि तणावास अधिक प्रतिरोधक असलेल्या माशांना चांगली प्रजाती मानले जाते. शोभेच्या माश्यांच्या दोन प्रकारांचे विपणन केले जाते. विदेशी सजावटीतील मासे आणि भारतातील मूळ मासे. ज्यांना रंगसंगती किंवा वर्तनासाठी शोभेचे मूल्य आहे. विदेशी मासळी देशांतर्गत बाजारावर अधिराज्य गाजवतात. उपलब्धता, मागणी आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार, शोभिवंत मासे उत्पादक प्रामुख्याने सामान्यत: पिल्ले देणाऱ्या आणि अंडी देणाऱ्या माश्यांचे प्रजनन व संगोपन करतात.
..
अंडी देणाऱ्या प्रजाती
अंडी देणाऱ्या प्रजाती अंडी काचेच्या भिंतीवर किंवा मत्स्यालयामधील वनस्पतींवर, चिकटणारी किंवा न चिकटणारी अंडी देतात; पण या माश्यांनी अंडी घालावी, म्हणून विशिष्ट परिस्थिती निर्माण करावी लागते. त्यामुळे या माश्यांची पैदास करणे थोडे अवघड असते. अंडी देणाऱ्या प्रजातींमध्ये काही प्रजाती अंड्यांची काळजी घेतात तर काही त्यांची अंडी नष्ट करतात, म्हणून प्रजातीनुसार प्रजननासाठीची मांडणी बदलावी लागते तसेच योग्य काळजी घ्यावी लागते. अंडी देणाऱ्या प्रजातीमध्ये प्रामुख्याने गोल्ड फिश, कोई, टायगर बार्ब, फायटर, टेट्रा, सिल्वर शार्क, एंजेल, रेड फिन शार्क, गुरमी इत्यादी प्रजातींचा समावेश होतो व या प्रकारच्या माश्यांचे प्रजनन आणि संगोपन करून हा व्यवसाय करू शकतो.
..
पिल्ले देणाऱ्या प्रजाती
पिल्ले देणाऱ्या प्रजाती या थेट पिल्लांना जन्म देतात. त्यामुळे पिल्ले देणाऱ्या प्रजातींचे प्रजनन करणे सोपे आहे. पिल्ले देणाऱ्या प्रजाती या सातत्याने पिल्लांना जन्म देत असतात व जन्माला आलेली पिल्ले आकाराने मोठी असल्याने वाढवायला सोपी असतात; पण या प्रजातींच्या प्रजननासाठी नर आणि मादी दोघांना छोट्या जाळीपासून तयार केलेल्या पिंजऱ्यामध्ये प्रजननासाठी ठेवले जाते. पिल्ले देणाऱ्या प्रजातीमध्ये प्रामुख्याने गप्पी, प्लॅटी, मोली, सोर्डटेल इत्यादी प्रजातींचा समावेश होतो. या प्रजाती वर्षभर प्रजनन करत असल्याने हा व्यवसाय फायदेशीर ठरतो.
...
मत्स्यपालन टाकी बांधणी आणि विक्री
शोभिवंत मत्स्यपालनामध्ये माश्यांची पैदास करणे आणि त्यांची वाढ करण्यासाठी मुख्यत: काचेच्या टाक्या, सिमेंटच्या टाक्या, एफआरपी टाक्या इत्यादी मत्स्यपालनासाठी वापरल्या जातत. घरातील काचेच्या मत्स्यपेटीतील मासे पाळण्याचा छंद खूप लोकप्रिय आहे. घरातील सजावटीसाठी आणि छंद म्हणून लोक मासे पाळतात. काचेच्या मत्स्यालयाचा आकार हा साधारणपणे चौकोनी, आयताकृती असतो. अशी मत्स्यालये तयार करून विक्री करता येते.( क्रमशः)
( लेखक शिरगाव, रत्नागिरी येथे मत्स्य महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत )
------------------