चिपळूण ः अरुण इंगवले यांना रत्नाकर कुलकर्णी स्मृती ''मसाप'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः अरुण इंगवले यांना रत्नाकर कुलकर्णी स्मृती ''मसाप''
चिपळूण ः अरुण इंगवले यांना रत्नाकर कुलकर्णी स्मृती ''मसाप''

चिपळूण ः अरुण इंगवले यांना रत्नाकर कुलकर्णी स्मृती ''मसाप''

sakal_logo
By

- ratchl193.jpg
22941
ः अरुण इंगवले
------------
रत्नाकर कुलकर्णी स्मृती पुरस्कार
अरुण इंगवले यांना जाहीर
चिपळूण, ता. १९ ः येथील नामवंत कवी, बोलीभाषांचे अभ्यासक आणि समीक्षक अरुण इंगवले यांना महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रतिष्ठेचा रत्नाकर कुलकर्णी स्मृती ''मसाप'' शाखा कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार २७ मे रोजी पुण्यात एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मसापच्या ११६ व्या वर्धापनदिन समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
इंगवले यांच्या सहा एकांकिका, एक नाटक आणि २ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ''आबूट घेऱ्यातला सूर्य''ला आजपर्यंत १२ हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून, त्यांच्या एकांकिकांनाही ३ राज्य पुरस्कार मिळाले आहेत. कोकणातल्या तिल्लोरी बोलीवर त्यांचे संशोधन सुरू आहे. इंगवले हे गेल्या चार दशकांहून अधिक काळ काव्यलेखन करत आहेत. इंगवलेंची कविता म्हणजे निव्वळ अभिव्यक्ती नाही तर ते सध्याच्या काळावरचं अमूल्य चिंतन आहे. कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिताना प्रसिद्ध लेखक-समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी या कवितेचं वर्णन एकविसाव्या शतकावरील समर्थ भाष्य असं केलं आहे.