देसाई, सावंत यांची कृषी प्रदर्शनास भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देसाई, सावंत यांची कृषी प्रदर्शनास भेट
देसाई, सावंत यांची कृषी प्रदर्शनास भेट

देसाई, सावंत यांची कृषी प्रदर्शनास भेट

sakal_logo
By

swt1922.jpg
23001
कुडाळः रणजित देसाई यांचा सत्कार करताना मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर. सोबत गोट्या सावंत. (छायाचित्रः अजय सावंत)

देसाई, सावंत यांची
कृषी प्रदर्शनास भेट
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ः जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनास आज जिल्हा माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी हजेरी लावली. या प्रदर्शनातील कृषी स्टॉल्स, कृषी अवजारे, बचतगट स्टॉल्स, पशु-पक्षी आदींची त्यांनी पाहणी केली.
मागील काही दिवस कृषी मेळावा आणि पर्यटन महोत्सवावरून शिवसेनेवर जिल्हा प्रशासनासह भाजप आणि विशेष करून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते; मात्र आज श्री. सावंत आणि श्री. देसाई यांनी महोत्सव स्थळी भेट दिल्याने जिल्हा परिषदेचे अधिकारी तसेच कर्मचारी काही गोंधळून गेले.
याबाबत श्री. देसाई म्हणाले की, जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात मोठी क्रांती झाल्यासारखे वाटत आहे. प्रदर्शनासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह महिला वर्गाचा अधिक समावेश आहे. प्रदर्शनाला आमचा विरोध नव्हता; पण सर्वांना विश्वासात घेऊन याचे नियोजन करता आले असते. तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सावंत म्हणाले की, पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या प्रदर्शनाला केवळ गर्दी झाल्याचे भासविण्यात आले आहे; पण याचा कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही निवडणुकीस तयार आहोत. यावेळी जिल्हा परिषदेकडून श्री. सावंत व श्री. देसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे रुपेश कानडे, किरण गावकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59710 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top